26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home सोलापूर सिध्देध्वर मंदिर भाविकांसाठी बंद , धार्मिक विधींना परवानगी

सिध्देध्वर मंदिर भाविकांसाठी बंद , धार्मिक विधींना परवानगी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सोलापूर ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रे दरम्यान भाविकांसाठी बंद राहणार आहे. धार्मिक विधींना परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी रात्री यात्रेसंदर्भातील निर्बंधातील आदेश दिले आहेत. सिध्देश्वर यात्रा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यानुसार १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणा-या यात्रेसाठी मंदिर भाविकांना बंद असणार असून जिल्हा व परराज्यातून भाविक येणार नाहीत यासाठी पोलिस आयुक्त आदेश जारी करणार आहेत. नंदीध्वज मिरवणूक रद्द करण्यात आली असून, धार्मिक विधीसाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी यात्रा नियोजनाबाबत सात पाती आदेश जारी केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर देवस्थानने ११ डिसेंबर रोजी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर पोलिस आयुक्त व अधीक्षक कार्यालयाने अभिप्राय सादर केला होता. या अभिप्रायावरून शासनाकडून परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिका-यांना विनंती केली होती. जिल्हाधिका-यांनी १६ डिसेंबरला हा प्रस्ताव पाठविला.

शासनाने २४ डिसेंबरला धार्मिक स्थळे सुरू करताना कोरोना विषाणूचे संक्रमण होउ नये म्हणून घालून दिलेल्या नियमावलीनुसार विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हाधिका-यांनी निर्णय घ्यावा असे कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी २६ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तांकडे यात्रेबाबत प्रस्ताव सादर केला. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी पोलिस आयुक्त व अधिक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होउ नये म्हणून घातलेल्या अटीचे पालन करून परवानगी देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना ८ जानेवारीला दिले आहेत.

यण्णीमजनला नाही परवानगी
या अनुषंगाने आयुक्त पी. शिवशंकर यांनी यात्रेतील नियम अटीचा आदेश जारी केला. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १२ जानेवारी रोजीच्या यण्णीमजनसाठी नंदीध्वज मिरवणूकला परवानगी नाही. पण ११ जानेवारी रोजी मानाचे सातही नंदीध्वज मंदिर परिसरात सजवून प्रत्येक नंदीध्वजासोबत ५ प्रमाणे ३५ व्क्ती व १५ पुजारी अशा ५० जणांना मास्क, फिजीकल डिस्टन्स व सॅनीटायझरच्या वापरासह परवानगी दिली आहे. पंच कमिटीने दोन दिवस आधी ही नावे पोलिसांना द्यायची आहेत.

अक्षता सोहळयास असतील ५० जण
यात्रेच्या दुस-या दिवशी म्हणजे १३ जानेवारीला अक्षता सोहळा आहे. यानिमित्त मंदिरापासून संमतीकट्टयापर्यंत ७ नंदीध्वज आणण्यासाठी ३५ मानकरी व अक्षता सोहळयासाठी १५ पुजा-यांना परवानगी दिली आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर नंदीध्वज मंदिरात निश्चित केलेल्या जागी जातील अशाच पध्दतीने १४ जानेवारी रोजी तीळ, हळदीचे उटणे लेपन करून नंदीध्वजांना गंगास्रान करण्यासाठी योगदंडाच्या मानक-यांना परवानगी देण्यात आली आहे. मानक-यांना पोलिस आयुक्तालयाचा पास राहणार आहे.

नागफणी, सजावटीस नाही परवानगी
नंदीध्वज मंदिर परिसरात निश्चित केलेल्या ठिकाणी राहतील. धार्मिक विधीसाठी मंदिर परिसरात नेण्यास परवानगी राहील. नागफणी व इतर सजावट करून मिरवणुकीस बंदी असेल. होम विधीसाठी होम मैदानावर परवानगी असलेल्या ५० जणांना जाता येईल. १५ जानेवारी रोजी शोभेचे दारूकाम व १६ जानेवारी रोजी होणा-या कप्पडकळ्ळी कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे. यात्रा काळात श्री सिध्देश्वर मंदिर बंद राहणार आहे. पंचकमिटीने भाविकांना लाईव्ह दर्शनाची सोय करावी. यात्रा काळात भाविकांची गर्दी होउ नये यासाठी देवस्थानने परिसरात स्वत:चे सुरक्षा रक्षक नेमावेत. मंदिर परिसर व शहरात पोलिस आयुक्तालय स्वतंत्र बंदोबस्त लावतील.

भंडारा अग्नितांडवाने महाराष्ट्र हळहळला !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या