सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या डोळ्यातून तैलाभिषेक प्रसंगी अश्रू तरळले. भाविक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकीमुळे विधीप्रसंगी अडथळे निर्माण होत होते. हा वाद सोडवण्यासाठी मानक-यांना जागोजागी थांबावे लागले. भक्तांविना प्रथमच सिद्धेश्वर यात्रा पार पडत असताना प्रमुख मानकरी हिरेहब्बू हे भावनाविवश दिसून येत होते. मंगळवारी ६८ लिंगांना मानक-यांनी तैलाभिषेक केला. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत विधी सोहळा पार पाडण्यात आला.
प्रतिवर्षीप्रमाणे असणारा हलग्या, वाजंत्री चा निनाद यंदा नाही. मात्र एकदा बोलाभक्त लिंग हर्रर… बोला हर्रर… सिध्देश्वर महाराज की जय चा जयजयकार सुरु होता. दर्शनासाठी यंदा भाविकांची रीघ नाही ही पण ५० मानकरी आणि पुजारी सेवेकरी ट्रस्टी यांना पूजा विधी पार पाडली. कोरोना पार्श्वभूमीवर यंदा यात्रेवर बंधनं आहेत, तसेच बंदोबस्तही कडेकोट आहे सातही मानाचे नंदीध्वज आज आहे त्याच ठिकाणी विधिवत पूजा करून ठेवण्यात आलेत. आज सकाळी १०.३० च्या सुमारास बाळीवेस येथील हिरेहब्बू मठातून पूजा-विधी झाल्यानंतर नंदीध्वज तिथेच ठेवून मानकरी पालखी घेवून काररथातून सिद्धरामेश्वर मंदिराकडे रवाना झाले. तिथे पूजा-विधी झाल्यानंतर ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मानकरी रवाना झाले.
रथ आणि पालखीचे विजापूरवेस येथे मुस्लीम युवकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केलं. रस्त्यात अनेक ठिकाणी भाविकांनी आपल्या घराजवळ उभारून पालखीचे दर्शन घेतलं. पोलीस प्रशासनाने कुठेही रथ आणि पालखी थांबू नये, गर्दी होऊ नये याची खबरदारी घेतली होती. आज सिद्धरामेश्वर मंदिराकडे येणारे रस्ते चोहबाजंूनी बॅरिकॅडींग टाकून बंद करण्यात आले आहेत. केवळ पासधारकांनाच मंदिराच्या दिशेने सोडण्यात आले. आज सोलापुरात यात्रेच्या विविध धार्मिक कार्यक्रमांना लोकांची गर्दी नसली तरी घरोघरी लोक या धार्मिक कार्यक्रमा निमित्ताने पूजा करत आहेत.
घरी नेवेद्य आणि प्रसादाचे कार्यक्रम सुरू आहेत. उद्या याच पद्धतीने अक्षता सोहळ्यासाठी निघण्याआधी सातही नंदीध्वजांचे आहे त्या ठिकाणी पूजन होईल. यानंतर वाहनातून हे नंदीध्वज संमती कट्ट्याकडे रवाना होतील. तिथे पूजन होऊन उपस्थित मानकरी अक्षता सोहळा पार पाडतील. या कार्यक्रमासाठीही नागरिकांना सिद्धेश्वर मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. अक्षता झाल्यानंतरही नंदीध्वज वाहनातूनच आपल्या जागी मार्गस्थ होतील. अनेक वर्षाची परंपरा असलेला सिध्दरामेश्वर धार्मिक उत्सव कार्यक्रम यंदा बंधनात कसा साजरा होणार याचं औत्सुक्य संपूर्ण महाराष्ट्रात होतं. मात्र भाविकांनी दाखविलेल्या सामंजस्यानं ही धार्मिक परंपरा पार पडत आहेत.
परिवर्तनशील श्रमशक्तीनिर्मितीचे आव्हान