चिकमहुद (वैभव काटे) : 2500 टन क्षमतेचा सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना गेली अनेक वर्षे बंद आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हा कारखाना सुरू करण्यासाठी मा. प्रफुल्ल कदम यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला साखर कारखाना बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील सहकार, उद्योग, शेती, व्यापार,शिक्षण या विविध क्षेत्रातील आणि विविध पक्षातील अनुभवी, तज्ज्ञ आणि कृतिशील लोकांची निमंत्रित समिती स्थापन करण्यात आली असून याची घोषणा आज कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी केली आहे.
या निमंत्रित समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व संस्थापक संचालक बाबुरावजी गायकवाड,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व प्रवर्तक संचालक पी.सी. झपके सर,भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व कारखान्याचे माजी चेअरमन शिवाजीराव गायकवाड,शेकापचे जेष्ठ नेते व खरेदी विक्री संघाचे चेअरमन पी. डी.जाधव,सांगोला शिवसेनेचे नेते व माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ,संस्थापक संचालक श्री तानाजीराव बनसोडे (भीमनगर, सांगोला),श्री भिवाजी चोपडे सर(सरपंच, वाकी घेरडी), श्री.प्रकाश सोळसे (यलमार मंगेवाडी),प्रा. संजयकुमार घेरडे (किडेबिसरी),श्री.संजय पवार (वाटंबरे), श्री.रविंद्र कांबळे (मांजरी),प्रा. कुंडलिक खांडेकर (देवळे),श्री.शिवाजी माळी (देवळे),श्री.बापूसाहेब शिंदे, (माजी सरपंच, गायगव्हाण) श्री. शिवानंद हिरेमठ (सांगोला) या पंधराजणांचा समावेश यामध्ये आहे.
सदर निमंत्रित समिती नंतर सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रतिनिधींचा समावेश असणारी तालुका बचाव समिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. सांगोला साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती खूपच अडचणीची असली तरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने साखर कारखाना सुरू करणे खूपच गरजेचे आहे यासाठी मी स्वतः राज्यातील आणि देशातील राजकीय,प्रशासकीय आणि उद्योजक मंडळीकडे पाठपुरावा सुरू केला असून निमंत्रित समितीच्या सहकार्य व मार्गदर्शनातून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.
जीम सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक, लवकरच निर्णय होईल – अमित देशमुख