सोलापूर : गुलअफशा ईशान हुंडेकरी (रा. दाजी पेठ, सोलापूर) हिचा पैशासाठी छळ केल्याप्रकरणी शिक्षिका असलेल्या सासूसह सहा जणांना सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. सासू नईमा नाहिद हुंडेकरी, सासरा नाहिद खतालसाब हुंडेकरी, नणंद अफशा फहद कर्नूल, कहेकशा मोमीन शेख, खालिद शाबोद्दीन शेख, मुन्नी खालिद शेख अशी अटकपूर्व जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.
लग्नानंतर आरोपींनी तिला व्यवस्थित सांभाळले आणि नंतर पैशासाठी तिला त्रास देऊ लागले. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपींनी अॅड. जहीर बी. सगरी यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.