22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeसोलापूरमहिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले

महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले

एकमत ऑनलाईन

बार्शी : बार्शी येथील एका बँकेत नोकरीस असलेली महिला घराकडे जात असताना दोन इसम एका दुचाकीवरून आले. एकाने तिच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावले आणि ते दोघेही पळून गेले. ही घटना ७ जुलै रोजी दुपारी भरदिवसा कोर्टाच्या मागील बाजूस असलेल्या उपळाई रोडवर घडली.

याबाबत सुनीता राजेंद्र नाडे (वय ४९ रा. दत्तनगर, बार्शी) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी महिला कोर्ट चौकातील एका स्टुडिओत फोटो काढून घराकडे त्यांच्या दुचाकीवरून जात होत्या.

त्या देवीच्या मंदिराजवळ येताच पाठीमागून बिगर नंबरच्या दुचाकीवरून दोन इसम येताच त्यांनी त्या महिलेच्या जवळ येऊन पाठीमागे बसलेल्याने तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावले आणि ते दोघेही निघून गेले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या