22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसोलापूरअभिजीत पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी; पंढरीत स्वखर्चाने पाटील यांनी उभारले थिएटरमध्येच...

अभिजीत पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी; पंढरीत स्वखर्चाने पाटील यांनी उभारले थिएटरमध्येच कोविड हॉस्पिटल

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : सध्या राज्यभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज हजारो रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळून येत आहे.यात प्रामुख्याने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक व लक्षणीय आहे.कोरोनाग्रस्तांच्या या वाढत्या संख्येमुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रुग्णालयांची व बेडची कमतरता भासत आहे.

अशा आणीबाणीच्या काळात तालुक्यातील सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर अशी ओळख असलेले धारशिव साखर कारखाना चेअरमन अभिजीत पाटील यांनी माणुसकी जपत स्वत:च्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये स्वखर्चाने कोविड हॉस्पिटल उभारून चक्क ५० रुग्णांच्या उपचारासाठी सोय उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये ५० बेडला ऑक्सिजनची सोय असेल, मेडिकल, लॅब, तज्ञ डॉक्टर कडुन उपचार, २४ तास डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता, पेशन्ट जेवनाची सोय सर्व सोयीचा हजारो लोकांना याचा फायदा होणार आहे.

सध्या ह्या दोन्ही तालुक्यात कोरोनामुळे स्थिती गंभीर बनली आहे.आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजनचे हॉस्पिटल उपलब्ध होत नसल्याने रुग्ण दगावत आहेत.त्यामुळे तातडीने उपचारासाठी अधिक रुग्णालये उभारणीची गरज निर्माण झाली असताना अभिजीत पाटील यांनी त्यांच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये कोविड रुग्णालय उभारून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.गतवर्षीच्या कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून सर्वप्रकारची मदत करत अभिजीत पाटील यांनी आपले सामाजिक भान जपले आहे.

गेल्या वर्षात कोरोनाकाळात पोलीस,आरोग्य कर्मचारी,तसेच पत्रकार बांधव तसेच हजारो कोरोना योध्यांना मोफत जेवण,विविध गरजू घटकांना वस्तू वाटप केले.घरोघरी जाऊन थर्मल स्कॅंिनग करीत होते,मुख्यमंत्री सहाय्यता निधी यासह अनेक प्रकारे अभिजीत पाटील यांनी मदत केली आहे. तसेच दोनच दिवसांपूर्वी रुग्णालयांची ऑक्सिजन कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिल्या पायलट ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली आहे.त्यासोबतच त्यांनी कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून हजारो गोरगरीब लोकांना अशा अडचणीच्या काळात मोठा आधार दिल्याने व कोणत्याही पक्षात सामील नसताना व कोणताही मोठा राजकिय वरदहस्त नसताना केवळ लोकसेवेसाठी त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आम्हाला बेड मिळेल का? म्हणून दररोज अनेकजण भेटायला येतात तसेच अनेकांचे कॉल येतात.सोलापूर जिल्हा व जिल्हा बाहेरील हॉस्पिटलांशी संपर्क करून शक्य तितक्या रुग्णालयांची बेडची व्यवस्था करून देतोय. मात्र वाढत्या रुग्ण संख्येमुळे यंत्रणा अपुरी पडत असल्याने सर्वांना बेड मिळणे शक्य नाही. त्यातून होणारी गरजू व गरिबांची तडफड पाहवत नव्हती.याच जाणिवेतून आपण काही लोकांचे प्राण वाचवू शकतो.यासाठी मी हे रुग्णालय सुरू करून लोकांच्या सेवेत समर्पित करत आहे. आपल्याला शक्य असेल तेवढी मदत सर्वांनी अशा काळात करणे गरजेचे आहे.
चेअरमन अभिजीत पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या