24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसोलापूरसोलापूर मनपा निवडणूकांंसाठी महिला आरक्षण जाहीर

सोलापूर मनपा निवडणूकांंसाठी महिला आरक्षण जाहीर

एकमत ऑनलाईन

सोलापूर : महापालिकेच्या सभागृहात आगामी निवडणुकीतून तीन सदस्यांच्या ३८ प्रभागांत एकूण ११३ नगरसेवक निवडून जाणार आहेत. यापैकी ५७ जागा महिलांसाठी आरक्षित असतील त्याची आरक्षण सोडत मंगळवारी छत्रपती रंगभवन येथे काढण्यात आली.

प्रथम अनुसूचित जातीसाठी महिला आरक्षण सोडत त्यानंतर अनुसूचित जमाती आणि शेवटी सर्वसाधारण जागेसाठी महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. या प्रक्रियेचे थेट प्रसारण सोशल मीडियातून करण्यात आले.

अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक २४ व ३५ असे दोन जागा असून, त्यापैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित असेल. अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक २४ मधील जागा महिलासाठी आरक्षित झाल्याने जमातीसाठी ती जागा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होईल आणि प्रभाग क्रमांक ३५ मध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण महिलासाठी असेल.

३८ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक २४ व ३८ वगळता ३६ प्रभागांत प्रत्येकी एक महिला सर्वसाधारण गटासाठी असेल. सर्वसाधारण महिलांसाठी ४८ जागा आहेत. त्यामुळे अन्य १२ जागांचे आरक्षण २१ प्रभागांमधून काढण्यात आले. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११३ जागांसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी शिवछत्रपती रंगभवन सभागृहात काढण्यात आली. आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त विक्रम पाटील, नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्यासह इतर अधिका-यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत निघाली. मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण काढण्यात आले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या