22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसोलापूरसोलापूरला लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसची भेट मिळणार

सोलापूरला लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसची भेट मिळणार

एकमत ऑनलाईन

सोलापूर – सोलापूरच्या विकासासाठी बहुप्रतिक्षेत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु होता. परंतु, संसदेच्या रेल्वे मंत्रालयाच्या कक्षात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या झालेल्या बैठकीत सुखद बाब घडली. यावेळी मुंबई – सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस देण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली. यासह रेल्वे संदर्भातील अन्य मागण्याबाबत चर्चा झाली. मंगळवारी संसद भवनात रेल्वे मंत्रालयाच्या कक्षात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची देखील उपस्थिती होती.

भारत सरकारच्या रेल मंत्रालय द्वारा अत्याधुनिक सुविधा असलेली व कमी वेळेत अधिक अंतर गाठणारी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. रेल मंत्रालय द्वारा देशात विविध भागात सन 2023 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय रेल मंत्रालय द्वारा घेण्यात आलेला आहे. सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी रेल्वेने जवळपास आठ तास लागतात. सोलापूर येथून मुंबई व पुण्याला दर दिवशी जवळपास 5 ते 7 हजार प्रवासी शिक्षण,व्यापार व इतर कामानिमित्त प्रवास करत असतात. मुंबई सोलापूर मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यास मुंबईहून पुण्यावरून सोलापूरला येणारे व सोलापूरहून वरील दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना हे अंतर साधारणतः निम्म्या वेळेत पार करता येणे शक्य होणार असून त्यामुळे हि फार मोठी सुविधा उपलब्ध होईल.

तसेच सोलापूर हे पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर , हत्तरसंग कुडल, हैद्रा सारख्या तीर्थस्थळांना दर्शनासाठी प्रतिवर्षी भारतातून लाखो भाविक येतात. त्यामुळे सोलापूर- द्वारका (गुजरात) नवीन रेल्वे सुरु व्हावी जेणे करून सोलापूरसह अन्य जिल्ह्यातून भाविकांना गुजरातला जाणे सोपे होईल, अशीही मागणी प्रामुख्याने करण्यात आली. याबरोबर सोलापुरातून जाणाऱ्या बसवा एक्स्प्रेस – 17307 ला अक्कलकोट रोड येथे प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात यावा.हुबळी – सोलापूर – नवीन रेल्वे सुरू करणे. सोलापुरात सुरु असलेली किसान रेल्वे सेवा पुनर्स्थापित करणे, सोलापुर ते त्रिवेंद्रम दरम्यान नवी किसान रेल्वे सेवा सुरु करावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या