24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeसोलापूरउमेद अभियानात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

उमेद अभियानात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
केंद्र सरकाराने ग्रामीण महिलांच्या विकासासाठी सुरू केलेल्या ‘उमेद’ अभियानाची वचनबध्दता टिकविण्याकामी सोलापूर जिल्ह्याने मागील सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करीत ९८.३३ टक्के उद्दिष्ट साध्य केले होते. यात संपूर्ण राज्यात सोलापूर सर्वप्रथम आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

अभियानाची वचनबद्धता टिकवण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचा-यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांच्या मार्गदर्शनानुसार सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी झाली आहे.

जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी उपजीविका उभ्या करणाची मोहीम सीईओ स्वामी राबवली. स्वयंसहाय्यता गटांना तब्बल १८६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून ११४ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून ग्रामीण भागातील महिलांना मोठा आर्थिक आधार देण्यातही सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे. यासाठी प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी जिल्हा व तालुका स्तरावर बँकेसोबत बैठका घेणे व तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित करणे, यासाठी प्रयत्न केले. रुक्मिणी सप्ताह राबवून बचत गटांच्या उत्पादित मालास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये ब्रँंिडग, पॅकेंिजग व बाजारपेठेत व्यापा-यांशी करार करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या