24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home सोलापूर सोलापूरकरांची प्रतिक्षा संपली, कोरोना लस दाखल

सोलापूरकरांची प्रतिक्षा संपली, कोरोना लस दाखल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कोविड-१९ अजुन संपलेला नाही. त्यामुळे आपले कर्तव्य आहे की, जोपर्यत यावर औषध येत नाही, तोपर्यंत खबरदारी घ्या. मोबाईलवर कानी पडणारी ही डायलर टोन आता सर्वांच्या अंगवळणी पडली आहे. काहीजण संतापून हेच किती दिवस ऐकविणार अशी तक्रार करताना दिसत होते. पण बुधवारी रात्री पुण्याहून बॉक्स घेउन गाडी आली अन् चला आता लसीकरणाची वेळ झाली अशी चर्चा सोलापुरात सुरू झाली आहे.

१६ जानेवारी रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यासाठी सरकारी व खाजगी अशा ३८ हजार आरोग्य कर्मचा-यांची पोर्टलवर नोंद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या कर्मचा-यांना लसीकरण करण्यासाठी राज्य आरोग्य विभागातर्फे लस उपलब्ध करण्यात आली. आरोग्य उपसंचालकांच्या पुण्यातील औंध येथील कार्यालयातून सोलापूरसाठी ३४ हजार लस असलेले तीन बॉक्स पाठविण्यात आले.

पुण्याहून लसीचे बॉक्स घेउन आरोग्य विभागाची व्हॅन रात्री आठ वाजता सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या जिल्हा आरोग्य विभागाच्या औषधालयासमोर दाखल झाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतकुमार जाधव, लसीकरण प्रमुख डॉ. अनिरूध्द पिंपळे, डॉ. जोगदंड, माध्यम अधिकारी रफिक शेख, फार्मासिस्ट प्रविण सोळंकी यांनी स्वागत केले. नारळ वाढवून शीतसाखळी अबाधित ठेवण्यासाठी लसीचे बॉक्स २ ते ८ अंश तापमान असलेल्या शीतगृहात ठेवण्यात आले. मागणीप्रमाणे पुन्हा लसीचा पुरवठा होणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य विभागातर्फे कोरोना लस आणण्यासाठी फॉर्मासिस्ट दिनेश नन्ना व चालक संजय भोसले हे बुधवारी पहाटे पुण्याला गेले होते. दुपारी अडीच वाजता सोलापूरचा नंबर आला. लस भरून परतताना सोलापूर कधी आले हे मला कळले नाही, असे भोसले यांनी सांगितले. ३४ वर्षाच्या नोकरीत अनेक कामे केली पण सोलापूरकरांच्या आरोग्यासाठी महत्वाची असणारी ही लस आणताना मला आकाश ठेंगणे झाले. नन्ना यांनीही लस हाती पडल्यावर आनंदून गेल्याचे सांगितले.

‘बर्ड फ्लू’विषयी थोडेसे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या