बार्शी (विवेक गजशिव) : बार्शी नगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ पाहत आहे.अशातच सोपल गटाला मोठा धक्का बसला आहे.बार्शीतील माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या मांगडे परिवारातील माजी नगराध्यक्ष दगडू नाना मांगडे यांच्या मुलांनी बाबा मांगडे व विशाल मांगडे व नातू सुजीत मांगडे व अजित मांगडे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
मांगडे यांच्या प्रवेशामुळे तुळजापूर रोड,पाटील चाळ,मांगडे चाळ या भागात मोठी पोकळी निर्माण झाली असून भविष्यात ती पोकळी भरून काढण्यासाठी माजी मंत्री दिलीप सोपल काय डावपेच आखणार याकडेसुद्धा आता बऱ्याच जणांचे लक्ष लागून आहे.यावेळी विशाल मांगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही मुलं कार्यकर्त्यांसमवेत आमदार राऊत गटात प्रवेश करत आहोत मात्र आमचे वडील माजी नगराध्यक्ष दगडू मांगडे हे सोपल गटासोबत राहणार असल्याचे सांगितले.आमचा निर्णय आम्ही घेतला आहे.
वडिलांची भूमिका ही त्यांच्यासोबत राहील असे यावेळी विशाल मांगडे यांनी सांगितले.यावेळी पक्ष प्रवेशाची चाहूल रात्री सोशल मिडियाच्या माध्यमातून लागल्यानंतर शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दगडू मांगडे यांची भेट घेतली व चर्चा केली.माजी मंत्री दिलीप सोपल यांनीही मांगडे कुटुंबाशी संपर्क साध्यल्याची सूत्रांकंडून माहिती मिळाली मात्र त्यांची मनधरणी करण्यात सोपल गट पूर्णपणे अपयशी ठरल्याचे समोर येतेय.त्यामुळे मंगळवार दि.२७ ऑक्टोबर रोजी मुलगा बाबा,विशाल नातू सुजीत व अजित मांगडेंसह ४० कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मांगडे यांच्या प्रवेशामुळे नगरसेवक रोहित लाकाळ आणि मांगडे परिवाराचा टोकाचा वाद देखील संपुष्टात आल्याचे समोर येतेय.त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आणखी काय घडामोडी घडणार आहेत आता याकडे बार्शीकरांचे लक्ष लागले आहे.या पक्ष प्रवेशावेळी नगरसेवक प्रशांत कथले,बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे,भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष ॲड.राजश्रीताई डमरे-तलवाड,नगरसेवक रोहित लाकाळ,नगरसेवक संदेश काकडे,शिरीष जाधव आदी उपस्थित होते.
आपट्याच्या पानावर लिहून राष्ट्रीय प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी केली जनजागृती