27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeसोलापूरसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाला सोलापूर जिल्ह्यात गती : अ‍ॅड. विकास ढगे...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाला सोलापूर जिल्ह्यात गती : अ‍ॅड. विकास ढगे पाटील

एकमत ऑनलाईन

अकलूज : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाला सातारा व सोलापूर जिल्ह्यात गती आली आहे . पुणे जिल्ह्यात मात्र काम मंद गतीने सुरु आहे. या गतीनेच कामे होणार असतील तर वारक-यांची वाट सुखकर कशी होणार असा सवाल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड विकास ढगे पाटील यांनी केला आहे . पालखी सोहळा प्रमुख , प्रमुख विश्वस्थ , मानकरी व अधिका-यांनी शनिवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचा धावता दौरा केला .

आषाढी वारी आता केवळ महिन्यावर येवून ठेपल्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी करण्यात येत आहे . चैत्री वारीपासून आज अखेर पाच दौरे करण्यात आले आहेत. सातारा व सोलापूर जिल्ह्यातील काम अधिकारी व ठेकेदार यांच्या अथक परिश्रमामुळे प्रगतीपथावर आहे . परंतु पुणे जिल्ह्यातील सासवड येथील क-हा नदीवरील पुल मात्र निधी अभावी रखडला असल्याचे सांगण्यात येते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी पायी वारी सोहळा निघाला नाही . परंतु यंदा या सोहळ्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे . दिंडीप्रमुखांकडून तशी माहिती मिळत आहे . त्यामुळे यंदा आषाढी वारी १४ लाखांचा आकडा पार करेल असा विश्वास व्यक्त करुन वारीतील वारक-यांची लक्षणीय वाढ लक्षात घेता पालखी मार्गाची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे ढगे पाटील यांनी सांगितले .

धर्मपुरी ते वाखरी हा सुमारे ७० किलोमीटरचा पालखी मार्ग पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या वतीने जे. एम . म्हात्रे व एस. एम. अवताडे यांच्या कंपनीला काम दिले गेले आहे. या दोन्ही कंपन्यांनी आता कामाला गती दिली आहे. धर्मपुरी ते खुडूस पर्यंतचे काम जे . एम . म्हात्रे या कंपनीकडे तर खुडूस ते वाखरी पर्यंतचे काम एस. एम. अवताडे या कंपनीकडे आहे .

या संपूर्ण पालखी मार्गाची पहाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई , विकास ढगे पाटील , व्यवस्थापक माऊली वीर , मालक बाळासाहेब आरफळकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर , बाळासाहेब चोपदार , दिंडी प्रमुख भाऊसाहेब गोसावी , सचिव मारुती कोकाटे , एकनाथ जळगावकर , बाळासाहेब उखळीकर , पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पोंदे , प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर , तहसीलदार जगदीश न्ािंबाळकर , नायब तहसीलदार मनोज स्तोत्रे , उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे , विक्रम कदम , प्रकल्प संचालक केशव घोडके , सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील जाधव , जे . एम . म्हात्रे इंफ्रा प्रा . लि . चे जनरल मॅनेजर दीपकस्ािंह पाटणकर , एस . एम . अवताडे कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अभिजीत कुलकर्णी , सुरज शहा यांच्यासह अधिकारी व ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी केली .

धर्मपुरी पालखी तळ , पुरंदावडे येथील अश्वांचे गोल रिंगणाची जागा , वेळापूर धाव्याजवळील भारुडाची जागा व पालखी ठेवण्याचा कट्टा तसेच टप्पा येथील बंधू भेटीच्या सोहळ्याची जागा ही व्यवस्थित करुन देण्याची मागणी तसेच पालखी तळाच्या परिसरातील अतिक्रमणे त्वरीत काढून टाकावीत अशी मागणी सोहळा प्रमुखांनी केली . त्यावर प्रकल्प संचालक केशव घोडके यांनी संबंधित ठेकेदारांना याबाबत सूचना दिल्या . ही कामे सोमवार पासून सुरु केली जातील व सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पूर्ण होतील असे ते म्हणाले . पालखी तळावरील अतिक्रमणे त्वरीत दूर केली जातील असे प्रांताधिकारी आप्पासाहेब सम्ािंदर यांनी सांगितले .

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने पालखी तळावर लावण्यासाठी सुमारे दोन मिटर लांबीची वारकरी पताका भेट देण्यात आली . परतीच्या प्रवासात टप्पा येथील सकाळची न्याहरीची जागा ही उड्डाणपूल बांधल्याने टप्पा चौकात घेण्यात आली . या निर्णयाचे देशमुख परिवारासह गावक-यांनी स्वागत केले .

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या