सोलापूर : मुलाच्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी आलेल्या लातूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी स्रेहलता जाधव यांनी रविवारी दुपारी हॉटेलच्या रूममध्ये गळफास आत्महत्या केली. विजापूर नाका पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
जाधव कुटुंब लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी कर्नाटकातील चडचण येथे गेले होते. शनिवारी रात्री उशीर झाल्याने सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमित्त लातूरला गेले आणि दुपारी स्रेहलता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित घटनेची विजापूर पोलिस घेऊन ठाण्यात अकस्मात मयत नोंद असून जाधव कुटुंबीयांचा जबाब नोंदविल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडेल. काही दिवसांपूर्वीच स्रेहलता यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. पोलिस सूत्रांनुसार मानसिक त्रासातून रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य केले असावे असा संशय तपास अधिकारी विशाल घुगे यांनी व्यक्त केला.