22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरपंढरपूर जवळ एसटी व कारचा भीषण अपघात; एक ठार तर सहा...

पंढरपूर जवळ एसटी व कारचा भीषण अपघात; एक ठार तर सहा गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथवाडी जवळ नाईकनवरे मळा येथे रविवारी १७ एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास देवदर्शन उरकून लातूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या कारचा आणि उस्मानाबाद वरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटीचा समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की होंडाकार एम.एच ११ बीव्ही १९४२ या गाडीतील भाविक देवदर्शन करुन लातूरकडे जात असताना पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथवाडी येथे उस्मानाबादहुन- कोल्हापूरकडे जाणाऱ्या एम.एच १३ सीयु ७९२७ या एसटी बसचा समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातात उपचारादरम्यान कार मधील दत्ता रामा भोसले हा एकजण जागीच ठार झाला आहे. तर कार मधील व्यंकट मारुती भोसले,शरद वसंत भोसले, सुनील किसन भोसले, सचिन किसन कदम, शंकर माधव मोटे, शिवराज प्रल्हाद भोसले आदी सहा (सर्व रा. बोन्द्री ता.औसा जि. लातूर) जण गंभीर जखमी झाले आहेत. व बस मधील दोन प्रवासी काशीनाथ महादेव स्वामी, अमृता अनिल भुरटे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना स्थानिक लोकांच्या मदतीने पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अशोक जाधव, नितीन चवरे, सुजित उबाळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

चेअरमन अभिजीत पाटील यांची घटनास्थळी तातडीने मदत.
धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील कार्यक्रमात व्यस्त असताना पत्रकार मारुती वाघमोडे यांनी फोन करून अभिजीत पाटील यांना भैरवनाथवाडी जवळ अपघात झाल्याची माहिती दिली व सर्व जखमींना तातडीने उपचाराची गरज असल्याचे सांगितले. यावेळी पाटील यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन तीन ॲम्बुलन्स पाठवून जखमींना उपचारासाठी पाठवण्याची मदत केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या