21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeसोलापूरमाळीनगर येथे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात उभे रिंगण

माळीनगर येथे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात उभे रिंगण

एकमत ऑनलाईन

कृष्णा लावंड/अकलुज
प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरी े प्रेमें यावें तया गांवा । चोजवीत या वैष्णवां।।
या तुकोबारायांच्या पंक्तीप्रमाणे अकलूज येथील मुक्काम आटोपून सकाळच्या प्रहरी तुकाराम महाराज पालखी सोहळा माळीनगर ता.माळशिरस येथे उभे ंिरगण आणि विसावा घेण्यासाठी प्रवेश करता झाला. आकाशात दाटलेले मेघ, पावसाच्या येणार्या रिमझिम सरी, ंिदड्या, पताका, जयघोष करीत येणारे वारकरी आणि टाळांचा नादमय ध्वनी यांमुळे वातावरण भक्तिमय झाले आणि वारकर्यांबरोबरच ग्रामस्थ ही या भक्तीरसात न्हाऊन निघाले. पालखीच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आतुरतेने पालखीचे दर्शन घेण्याची घाई करत होते.कारण तब्बल दोन वर्षांनंतर पायी वारी सोहळा पार पडत होता.दोन वर्षाची ओढ काही केल्या कमी होत नव्हती.माळीनगर हद्दीत प्रवेश करताच जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत माळीनगर चे सरपंच अभिमान जगताप , उपसरपंच नागेश तुपसौंदर्य , सदस्य महादेव बंडगर , तसेच रमजान इनामदार , शुगर केन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे , काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब शिंदे , तालुका वैद्यकीय रामचंद्र मोहिते , माळीनगर केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संकल्प जाधव , पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांनी माळीनगर पालखी प्रवेश करताना स्वागत केले .

यानंतर रस्त्यावर दुतर्फा जमलेल्या माणसांच्या मधून मानाच्या अश्वाने धावा घेत उभे ंिरगण थाटात पार पडले.
आता जावे पंढरीसी े दंडवत विठोबासी े
जेथे चंद्रभागतिरी े आम्ही नाचो पंढरपुरी े
जेथे संतांची दाटणी े त्याचे घेऊ पायवणी े
तुका म्हणे आम्ही बळी े जीव दिधला पाया तळी े
पालखी मॉडेल हायस्कूलच्या भव्य मैदानात आली उत्साहात स्वागत करण्यात आले. नवीन बांधलेल्या खुल्या रंगमंचावर पालखी विसावली.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे पादुकापूजन सासवड माळी शुगर फॅक्टरीचे संचालक मोहन लांडे व संध्याताई लांडे या उभयंताच्या हस्ते करण्यात आले . यावेळी सासवड माळी शुगर फॅक्टरी चे मॅनेंिजग डायरेक्टर राजेंद्र गिरमे , व्हा चेअरमन परेश राऊत, होलटाईम डायरेक्टर सतीश गिरमे , जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर , इले.इंजि. अनिल जाधव , अनिल जोशी , मुख्य सुुरक्षा अधिकारी शार्दुल शिंदे , शेतकी अधिकारी सचिन कुदळे , ंिरकू राऊत आदी उपस्थित होते.
दुपारचा विसावा घेतल्यानंतर व पालखी दर्शनरांगा झाल्यानंतर भाविकांच्या भावना तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पांडुरंगाच्या ओढीनं पुढे बोरगाव मुक्कामी पालखी मार्गस्थ झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या