25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeसोलापूरम्हसवड ते टेंभुर्णी रस्त्याचे काम पंधरा दिवसात सुरू करा

म्हसवड ते टेंभुर्णी रस्त्याचे काम पंधरा दिवसात सुरू करा

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी : म्हसवड ते टेंभुर्णी या राज्य महामार्गाचे काम अकलूज ते टेंभुर्णी हे गेली तीन वर्ष रखडलेले असून रस्ता तयार करण्यासाठी पुर्वीचे रस्ते उखलल्यामुळे मोठ मोठे खडे तयार झाले असून यात कमरेपर्यंत पाणी साठल्याने गाळ व पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडत असून हे काम पंधरा दिवसात व त्वरीत हाती न घेतल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेना तालुका प्रमुख मधूकर देशमुख यांनी दिला आहे.

म्हसवड ते टेंभुर्णी हा चौपदरी सिंमेट काँक्रीट रस्ता तयार होत असून गेली तीन वर्ष याचे काम चालू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे कामे अपूर्ण असून केवळ रस्ते उकरून खड्डे करून ठेवलेले आहेत. एमएसआरडीसी कंपनीने हे काम हाती घेतलेले आहे. टेंभुर्णी ते संगम हा दहा ते १२ किलोमीटरचा रस्ता केवळ खोदून ठेवला आहे. या खड्यात तीन ते चार फूटापर्यंत पाणी साठलेले असते. यामुळे मोटारसायकल लहान चार चाकी वाहने सायलंसर मध्ये पाणी गेल्याने बंद पडतातकिंवा गाळात रूतून बसतात. ही अडकलेली वाहने ट्रॅक्टरचा मदतीने बाहेर काढावी लागतात.

वेळ व पैसा वाया जात असल्याने जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही वाहनधारक रस्त्याचा त्रासामुळे टेंभुर्णी इंदापूर मार्गे अकलूजला जाणे पसंत करत आहेत. अकलूज येथे वैद्यकीय सेवा चांगली मिळत असल्याने अनेक रूग्ण तेथे जात असतात. रस्त्याचा दुर्दशेमुळे रूग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून हा रस्ता त्वरीत दुरूस्ती करून देण्याची मागणी तालुका प्रमुख मधूकर देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एमएसआरडीसी ची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उपअभियंता राजकुमार इंगळे यांना प्रतिक्रिया विचारली असता. मी सर्वात खालचा अधिकारी असून वरिष्ठांना या संदर्भात विचारा, ज्यांचे कडून माझा संपर्क क्रमांक मिळवला त्यांचे कडूनच वरिष्ठ अधिका-यांचे नंबर घेऊन बोला असे उध्दटपणे उत्तर त्यांनी दिले.

एमआरडीसीने जमीन अधिग्रहण करून दिलेली नाही. जेवढी जमीन अधिग्रहण करून दिली होती. तेवढेच काम पुर्ण झालेले आहे. यासंबंधी अधिक एमएसआरडीसीचे अधिकारी सांगू शकतील.
– श्रीनिवास कोपीशेट्टी (व्यवस्थापक मेगा इंटरप्राजेस हैद्राबाद)

अकलूज व टेंभुर्णी भागात साखार कारखान्यांची संख्या मोठी असून सर्व बागायती क्षेत्र आहे. टेंभुर्णी येथील शेतक-यांचा ऊस माळशिरस तालुक्यातील पांडूरंग सहकारी कारखाना, दि. माळी शुगर, सहकार महर्षी अकलूज या कारखान्यांना जातो. तर अकलूज भागातील ऊस विठ्ठलराव शिंदे, भैरवनाथ, विठ्ठल शुगर आदी कारखान्यांना येत असतो. अकलूज टेंभुर्णी रस्ता अत्यंत खराब असल्याने ऊसाचा वाहनामुळे कोंडी होत असून ट्रॅक्टर पलटी झाल्यास शेतक-यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
– मधूकर देशमुख (शिवसेना तालुका प्रमुख माढा)

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या