सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरोधात राबविलेल्या मोहिमेत सोलापूर शहरातील विठ्ठलनगर एमआयडीसी, मुळेगाव तांडा व अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावच्या हद्दीत अचानक धाड टाकून कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवार, २६ जुलै रोजी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अवैध दारूविरोधात धाडसत्र राबविले. निरीक्षक सुनील कदम व दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांच्या भरारी पथकाने सोलापूर शहरातील क्रमांक एमएच १३ डीडब्लू १७७२ या वाहनावरून ३ रबरी ट्यूबमधून २१० लिटर हातभट्टी दारूची वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने गुन्हा नोंदविला. सदर गुन्ह्यातील आरोपी वाहन सोडून फरार झाला असून त्याचा तपास सुरू आहे. निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाने येथे एका दुचाकी वाहन क्र. एमएच १३, अटक केली.
विठ्ठलनगर एमआयडीसी परिसरात एका टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी बीएफ ७७०४ या वाहनावरून सहा रबरी ट्यूबमधून ४८० लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना नीलेश राजू राठोड (रा. मुळेगाव तांडा) या इसमास अटक केली.
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावाच्या हद्दीत विठ्ठल ढाब्यावर विश्वनाथ नीलकंठ राठोड या इसमाच्या ताब्यातून विविध कंपनीच्या इंग्लिश दारू १८० मिली क्षमतेच्या प्रत्येकी १० बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अक्कलकोट पोलिसात मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके अवैध दारू बाळगणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करीत आहेत.