27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeसोलापूरगुरसाळ्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

गुरसाळ्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

एकमत ऑनलाईन

गुरसाळे : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर, गुरसाळे,ता. पंढरपूर या कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी येथील प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना श्री. विठ्ठल बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.बी. पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले असून सविस्तर मागण्या त्यात नमूद करण्यात आल्या आहेत.

श्री विठठ्ल सहकारी साखर कारखान्याचे सभासद व त्यांचे प्रतिनिधी या नात्याने प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्यांच्या अनुशंगाने कारखान्याच्या प्रशासनास आदेशीत करण्याबाबत निवेदन दिले असून त्यात गळीत हंगाम २०१८-२०१९ मधील गळित केलेल्या ऊसापोटी शेतकऱ्यांची एफआरपीची थकित रक्कम त्वरित द्यावी, कामगारांचा थकित पगार त्वरित देण्यात यावा, गळीत हंगाम २०२०-२०२१ मध्ये साखर कारखाना सुरू करावा, ज्या कामगारांना कामावरून कमी केलेले आहे त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावे, वाहतुकदारांची वाहतुक बीले व कमिशन पोटीची थकीत रक्कत ताबडतोब द्यावी, श्री विठठ्ल सर्व सेवा संघातर्फे उचल म्हणून दिलेली व थकीत असलेली सर्व रक्कम वसूल करून घेण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी या मागण्या केल्या असून या निवेदनाच्या अनुषंगाने सदर कारखान्याच्या प्रशासनास कार्यवाही करण्याच्या दृष्टीने आदेशीत करण्यात यावे अशी विनंती केली आहे.

या निवेदनावर श्री. विठ्ठल बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.बी. पी. रोंगे, शेखर भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, पांडुरंग नाईकनवरे, दीपक भोसले, पांडुरंग देशमुख यांच्या सह्या असून निवेदन देताना नारायण मेटकरी, डॉ. धर्तीराज शिंदे, सुभाष होळकर, अंकुश शेंबडे, दिलीप भोसले, शिवाजी रणदिवे यांच्यासह उत्तम बाबा चव्हाण, माऊली भोसले, सचिन अटकळे, बापू नवले व इतर उपस्थित होते. छायाचित्र- १.गुरसाळ्यातील श्री विठठ्ल सहकारी साखर कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन देताना श्री. विठठ्ल बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.बी. पी. रोंगे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, शेखर भोसले, पांडुरंग नाईकनवरे, डॉ. धर्तीराज शिंदे आदी.

अवैध वाळू उपस्यावर कार्यवाही, ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या