22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home महाराष्ट्र बार्शी, सोलापूर रेशन दुकानात वितरण करण्यासाठी आलेला ११० टन तांदळाचा साठा जप्त

बार्शी, सोलापूर रेशन दुकानात वितरण करण्यासाठी आलेला ११० टन तांदळाचा साठा जप्त

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कोविड या संसर्गजन्य आजाराचामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. दरम्यान या संसर्गजन्य आजारांच्या काळात कोणत्याही व्यक्तीची उपासमार होवू नये म्हणून गोरगरिबांना केंद्र सरकारच्या वतीने रेशनकार्डवरील प्रति व्यक्तीस 5 किलो अन्न धान्य वितरण केला जात आहे.

मात्र, बार्शी सोलापूर जिल्ह्यात गोरगरिबांना रेशन दुकानात वितरण करण्यासाठी आलेला तांदूळ पनवेलजवळील पळस्पेनजीक असलेल्या टेककेअर लॉजीस्टिक या गोडावूनमध्ये साठवून केली जात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांच्या पथकाने शुक्रवार रात्री गोडावूनमध्ये छापा टाकून ह ११० टन रेशनचा तांदुळ आणि चार कंटेनर जप्त करून भीमशंकर रंगनाथ खाडे, इकबाल काझी आणि लक्ष्मण पटेल या आरोपींना ताब्यात घेतले. आता पुढील तपास पोलीस करीत आहे.

या गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३३,०८,००० रूपये किंमतीचा रेशनिंग तांदुळाच्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या एकूण २२२० गोण्या (सुमारे ११० टन) यामध्ये Asian Rice लोगो असलेल्या व 1) Food Corporation of India 2) Government of Punjab 3)Government of Haryana असे नाव असलेल्या गोण्या व दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा पोलिसांनी जप्त केला आहे.

Read More  कोरोनामुळे निराधाराची उपासमार, क्राय व संकल्प संस्था बनली आधार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow