सोलापूर : डिजिटल बॅनर लावण्यासाठी दोन गटात झालेल्या वादातून शनिवारी रात्री न्यू लक्ष्मी चाळ येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यात दगडफेक करत एक दुचाकी आणि पानपट्टीचे नुकसान केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तडीपार आदित्य शैलेंद्र माने (रा. थोबडे मळा, देगाव नाका) याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली.
दोन गटात बॅनर लावण्याच्या . कारणावरून मोठा वाद झाला. काहींनी हातात तलवारी, कोयते, विळे घेऊन परिसरात दगडफेक करत एका पानपट्टीचे नुकसान केले. याप्रकरणी आदित्य शैलेंद्र माने, समर्थ प्रवीण कांबळे (रा. हौसे वस्ती), संतोष आनंद कांबळे (रा. क्रांती नगर, अमराई), मधुकर मनोज साबळे (रा. हौसे वस्ती), आदित्य शिवाजी भोसले ( दमाणी नगर), विजय विष्णू कांबळे, अक्षय साबळे, धनंजय चव्हाण, कुणाल गायकवाड, शैलेश गायकवाड, ओंकार हांडे, स्वप्निल बचुटे, श्याम निकम (सर्व रा. सोलापूर) यांच्यासह एक अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी आदित्य माने, समर्थ कांबळे, संतोष कांबळे, मधुकर साबळे, आदित्य भोसले यांना अटक करण्यात आली आहे. तसेच यातील फरार झालेल्या संशयित आरोपींची देखील शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तलवारी, विळे, कोयता, बांबू साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास सपोनि विष्णू गायकवाड करीत आहेत.