24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसोलापूरसुतदरवाढीविरोधात यंत्रमागधारकांचा कडकडीत बंद

सुतदरवाढीविरोधात यंत्रमागधारकांचा कडकडीत बंद

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मागील सहा महिन्यांत सुताच्या दरात शंभर टक्क्यांची वाढ झाली असून, वाढीव दरामुळे टॉवेल्स आणि सोलापुरी चादरीच्या दरातही भरीव वाढ झाली आहे. उत्पादनाच्या किमतीत दुप्पट वाढ झाल्याने सोलापुरी टॉवेल्स व चादरींना बाजारात मागणीच नाही, अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे, यंत्रमाग उद्योग मागील सहा महिन्यांत निम्म्यावर येवून थांबला आहे. या पार्श्वभूमीवर सुताच्या वाढीव किमतीविरोधात यंत्रमागधारकांनी सोमवारी लाक्षणिक बंद सोमवारी पुकारला.

सोमवारी दिवसभर कारखाने बंद करून शासकीय धोरणाचा निषेध करण्यात आला. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली. बंदचा फटका शहरातील चाळीस हजार यंत्रमाग कामगारांना बसला. बंदमुळे सोमवारी जवळपास सहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

पूर्वी सुताचे दर प्रतिकिलो १८० ते १९० रुपये होते. आता दर प्रतिकिलो ३४० ते ३८० पर्यंत पोहोचले आहेत. सदर दरवाढ यंत्रमाग उद्योगाला नुकसानकारक आहे. याची जाणीव सरकारला नसल्यामुळे दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. सरकार शेतक-यांना हमीभाव देण्याच्या उद्देशाने सुताच्या दरात वाढ करीत आहे. शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार यंत्रमाग उद्योगात आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे दिवसेंदिवस उद्योग मागे पडत आहे. पूर्वी या उद्योगात एक लाख कामगार कार्यरत होते.

आता ही संख्या चाळीस हजारांवर आली आहे. आता पाचशे कारखानदार उरले असून, केवळ बारा हजार पारंपरिक यंत्रमाग शिल्लक आहेत. यामुळे यंत्रमागधारकांनी शासनाच्या धोरणांविरोधात लाक्षणिक बंद पुकारला असून सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाने जिल्हाधिका-यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनावर संघाचे प्रेसिडेंट धर्मण्णा सादूल, सचिव राजू राठी यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या