29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसोलापूरसोलापूर शहरात कडक संचारबंदी

सोलापूर शहरात कडक संचारबंदी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कोरोना पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पोलीसांनी शहरात २१ ठिकाणी नाकेबंदी करून रस्त्यावर फिरणारी मोकाट गर्दी आटोक्यात आणली आहे. शुक्रवार रात्रीपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत विकेंड संचारबंदी सुरू झाली आहे. शुक्रवारी रात्रीच पोलीस रस्त्यावर उतरले होते. उशिरापर्यंत फिरणारे किंवा गल्ली बोळात गप्पा मारत बसणारे यांना हुस्कावून लावले.

शनिवारी सकाळी फिरायला जाणा-यांना मज्जाव करण्यात आला तर कामानिमित्त बाहेर पडणा-यांना रस्त्यात ठिकठिकाणी आडवून पोलीस कागदपत्रं तपासत होते फिरण्याच कारण योग्य आहे का? याची पडताळणी करत होते. या काळात ज्यांनी मास्क लावले नाहीत किंवा वाहन विषयक नियम पाळले नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर ज्यांची कारणं योग्य वाटली नाहीत त्यांना घरी पाठविण्यात आलं. आरेरावीची भाषा करणा-यांना किंवा हुज्जत घालणा-यांना पोलीसांनी काठीचा प्रसाद देवून पोलीस स्टेशनमध्ये पाहुणचारासाठी पाठविलं. शहराच्या विविध २१ भागात पोलीसांनी नाकेबंदी केली होती.

हि दिवसभर दोन सत्रांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद आहेत तर नागरिकांसाठीही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील अनेकांनी गि-हाईक नाही म्हणून दुकानंच उघडली नाहीत तर काहीजणांनी लवकर बंद केली. प्रवासी वाहतूक करणा-या रिक्षाचालकांकडून कोरोना चाचणी आणि अन्य नियमांची अंमलबजावणी सुरू आहे याचीही तपासणी सुरू होती. शासकिय कार्यालयं, बँका बंद होत्या. केवळ मेडिकल, दवाखाने यासाठीची वर्दळ अधिक दिसली. याशिवाय काही ठिकाणी लोकं गप्पा मारत उभे असलेलीही दिसून आले. चहा टप-या, हॉटेल बंदच होती.

पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दुचाकीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करता येईल. तर इतर वाहनातूनही त्याच्या ५० टक्के क्षमतेनंच प्रवाशांना प्रवास करता येईल असं प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. येत्या ३० एप्रिलपर्यंत सद्यस्थितीत हा नियम लागू असेल. नागरिकांनी नियमांच पालन करावं अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावं असंही त्या म्हणाल्या. लॉकडाऊन संचारबंदी काळात आरोग्य विषयक कारणासाठी नागरिकांना परवानगी घेवून जाता येईल कागदपत्रं दाखवावी लागतील. अन्य अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरी तिथे नागरिकांनी जाण्याचं टाळावं संबंधित व्यावसायिकास फोन करून आपल्याला हवी ती वस्तू घरपोच मागवून घ्यावी असं त्या म्हणाल्या. नागरिकांना लॉकडाऊन काळात स्वत दुकानात, मार्केट मध्ये जाण अपेक्षित नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दशक्रिया आणि अन्य विधी यासाठी ठराविक लोकांना संबंधित ठिकाणी सोडलं जाईल तसेच अंत्यविधीसाठीही लोकांची मर्यादा निश्चित केली आहे. जवळच्या पोलीस स्टेशनमधून त्यांना परवानगी द्यावी याविषयी सूचना केल्या जातील अशी माहितीही वैशाली कडूकर यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात वैद्यकीय सेवा, किराणा वगळता बाजारपेठ बंद !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या