21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeसोलापूरएसटीच्या लांब पल्ल्यांच्या गाड्याचे मिळणार ऑनलाईन रिझर्व्हेशन

एसटीच्या लांब पल्ल्यांच्या गाड्याचे मिळणार ऑनलाईन रिझर्व्हेशन

एकमत ऑनलाईन

सोलापूर : प्रवाशांची वाढती गर्दी पाहता एसटीच्या लांब पल्ल्याच्या गाडयांना ऑनलाईन आरक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना १५ दिवस आदी तिकीट आरक्षण करता येणार आहे. अनलॉकनंतर प्रवाशांची गर्दी वाढली आहे अशी माहिती विभागीय नियंत्रक एसटी महामंडळ विलास राठोड यांनी दिली.

लॉकडाउनमधील शिथिलता उठल्यानंतर प्रवाशांचा एसटीला प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी सोलापूर विभागातर्फे पूर्वीप्रमाणे एसटी बसमध्ये ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना आता घरी बसून सोलापूर विभागातील पुणे, नाशिक, मुंबई यासह ११० एसटीचे ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.

लॉकडाउनमध्ये एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा बंद होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या ने-आण करण्यासाठी फक्त एसटी धावत होती. महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकटया सोलापूर विभागाचे अंदाजे १८ ते २० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र शासनाने सात जूनपासून लॉकडाउनमधील निर्बधामध्ये शिथीलता दिल्यानंतरह्यासेलापूर विभागातर्फे पुन्हा पुर्वीप्रमाणे बसफे-या सुरू करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे पुण्यासाठी धावणा-या गाडयांना प्रवाशांची संख्या वाढत असल्याने मागील दहा दिवसांपासून ऑनलाईन आरक्षण करण्याची सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती एसटी प्रवाशाने दिली. इतर मार्गावर देखील एसटीच्या फे-या सुरू झाल्या आहेत. मात्र अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महामंडळाने या मार्गावरील बसेसला ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. आगामी काळात या गाडयांचा प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नामकरण वाद: सिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या