23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeसोलापूरबोपले येथे विद्यार्थ्याची आत्महत्या

बोपले येथे विद्यार्थ्याची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

मोहोळः शाळेसाठी पुणे शहरात पाठवत नसल्याने आजोबांकडे राहत असलेल्या एका सोळा वर्षीय मुलाने नाराज होऊन घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने वडिलांशी फोनवर बोलता बोलता आईला माझ्या मयतीवर रडू देऊ नका म्हणून कॉल कट केला होता. २० जुलै रोजी मोहोळ तालुक्यात बोपले येथे सायंकाळी ५ वाजता दुर्दैवी घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

सिद्धार्थ नामदेव लंगर (वय १६, रा. बोपले, ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून, याबाबत त्याचे वडील नामदेव नवनाथ लंगर (रा. बोपले, ता. मोहोळ) यांनी मोहोळ पोलिसांत खबर दिली आहे.

नामदेव हे लॉकडाऊन पूर्वी कुटुंबासमवेत पुणे येथे राहत होते. तिथेच मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण करीत होते. त्यांचा मोठा मुलगा सिद्धार्थ हा पुणे येथे शिक्षण घेत होता. कोरोना काळात . लॉकडाऊन काळात नामदेव लंगर हे कुटुंबासमवेत परत मूळ गावी बोपले येथे राहायला आले. त्यादरम्यान मुलगा सिद्धार्थ याला शाळेसाठी बोपले येथे आजोबा नवनाथ लंगर यांच्याकडे ठेवले आणि ते मोलमजुरीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात आहेरवाडी येथे गेले. मात्र सिद्धार्थ हा आई-वडिलांना फोन करून आपण पुणे येथे शाळेसाठी जाऊ, असे सांगत होता. त्याच्या आई-वडिलांनी जायचे नाही, इकडे राहू, असे सांगितल्याने तो नाराज झाला होता.

२० जुलै रोजीही त्याने दुपारी दोन वाजता वडिलांशी फोनवर संपर्क साधला आणि बोलता-बोलता आईला माझ्या मयतीवर रडू देऊ नका म्हणून फोन कट केला. वडिलांनी वारंवार फोन करूनही त्याने फोन उचलला नाही. त्यांनी तत्काळ चुलत भावाला फोन करून सिद्धार्थ कोठे आहे ते पाहण्यास सांगीतले. दरम्यान, सिद्धार्थच्या चुलतीने काही वेळात फोन करून सिद्धार्थ याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा निरोप दिला.

चुलते तानाजी यांनी त्याला तत्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले असता डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मरण पावल्याचे सांगितले. याबाबत मृत सिद्धार्थचे वडील नामदेव लंगर यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात मुलगा सिद्धार्थ याच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मुसळे हे करीत आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या