बार्शी (विवेक गजशिव ) : शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर असणा-या तावडी गावची गोष्ट.सध्या गावची लोकसंख्या बाराशेच्या आसपास आहे.गावाला तसा फारसा मोठा ऐतिहासिक संदर्भ नसला तरी शहराला चिकटून असल्यामुळे शेतीजमिनीला ब-यापैकी भाव आहे.भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अन मार्चमध्ये लॉकडाऊन झाले.वर्षाचा महसूल ज्या महिन्यात जमा होतो अगदी त्याचवेळी लॉकडाऊन जाहीर झाले.ब-याच कंपन्या बंद पडल्या,शहरं,वस्त्या कधी नाही ती एवढी अशांत झाली.रस्ते निर्मनुष्य झाली.गावात हाताला काम नाही म्हणून शहराकडे गेलेला बेरोजगार तरुणांचा लोंढा गड्या आपला गावच बरा म्हणून पुन्हा गावाकडे परतु लागला.अनेकांची घरे,संसारे कोरोनाने उद्धवस्त केली.मात्र त्यातही संकटालाही काही जणांनी संधी म्हणून पाहिले आणि आपले उद्योग,व्यवसाय उभारणी केली.
ही सक्सेस स्टोरी आहे, तावडी गावच्या माजी सरपंच शामला गोट फार्मचे परमेश्वर दगडू खंडागळे यांची. लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील रस्त्यांबरोबर बाजारपेठाही सुन्न पडल्या होत्या.याचाच फायदा शामला गोट फार्मला झाला आणि जवळजवळ तीन महिन्यात साडे आठ लाख रुपये शेळ्या आणि बोकडांची विक्री झाली.तसे पहायला गेलेतर परमेश्वर खंडागळे हे कुशल आणि कर्तबगार शेतकरी.१९८४ ला खुल्या प्रवर्गातून गावचे सरपंच राहिलेले परंतू तरीही आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे.चार मुले धनाजी खंडागळे,तानाजी खंडागळे,सुवर्णा पवार,सविता पालके पैकी धनाजी खंडागळे तांदुळवाडी शिक्षक,मुलगी सुवर्णा पवार महिला व बालकल्याण उपायुक्त नाशिक,सविता पालके नोकरी तीन मुलांना शिक्षण देऊन उच्चशिक्षित केले.त्यानंतर त्यांनी गावामध्येच शेती घेऊन बागायती शेती व्यवसाय केला.
शेतीला काही तरी पूरक व्यवसाय असावा म्हणून सन २०१३ साली ४० शेळ्या व ३ बोकड घेऊन एक एकर जमिनिमधे शेड बांधून शामला गोट फार्मच्या नावे शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला.तानाजी खंडागळे याला दोन व्यवसायात अपयश आले एक दुग्धव्यवसाय आणि दुसरा विटभट्टीचा आणि त्यातच तानाजीला शाळा,कॉलेजेसपेक्षा शेती आणि पशुसंवर्धनाची आवड होती.त्यामुळे तानाजीने शेळीपालनाच्या व्यवसायात भरभराट केली.आज तानाजी अस्सल अर्धबंदिस्त उस्मानाबादी शेळ्यांचे पालन आणि संगोपन करून वर्षाकाठी १२ लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे.व्यवसायाला सुरवात केल्यापासून एकदाही तोट्यात गेला नसल्याचेही यावेळी सांगितले.मात्र त्यांचा औषधांचा खर्च सोडला तर शेती घरची असल्यामुळे शेतातून येणारे सोयाबीन,ज्वारी,भुईमुग,तुर यांचे भुसकट करून ते शेळ्यांना खायला दिले जाते.
त्याबरोबरच मका,तुती,सुभाबळ,शिवरी या पिकांचीही खास शेळ्यांना खाण्याकरिता लागवड केली जाते.त्यामुळे २५ टक्के खर्च आणि २०० टक्के उत्पन्न हे शामला गोट फार्मच्या यशाची सूत्रे आहेत.त्यातच शेळ्यांपासून मिळणा-या लेंडीखतामुळे दहा एकर बागायत शेतीही कसदार बनून अधिकाधिक उत्पन्न देत आहे.महाराष्ट्रातील जवळपास २० जिल्ह्यातील लोकांनी या प्रोजेक्टला भेटी दिल्या आहेत.भेटी दिलेल्या सहा हजार लोकांचे अभिप्राय आहेत.त्यामुळे लॉकडाऊनमधे नोकरी गेलेल्या मेट्रो सिटीटील अनेक तरुणांनी आता शेळी पालन या व्यवसायाकडे कल घेतला आहे.त्यात काही तरुणांनी जमही बसवला आहे.त्यामुळे लॉकडाऊन आणि कोरोना काळात नोकरी गमावलेल्या तरुणांकडे शामला गोट फार्मने फार मोठा आदर्श ठेवला आहे.आता गरज आहे ती आत्मसात करण्याची.
भारतात शेळीच्या पंचवीस जाती आहेत.त्यातील महाराष्ट्रात उस्मानाबादी,कोकण कन्या,खानदेशी,जमनापरी अशा जाती आहेत.महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी इतर राज्यातील बिटेल,सिरोही,शेजत,आफ्रिकन बोअर या शेळ्यांच्या संक्रमित वाण पहायला मिळतात मात्र आम्ही इतर संक्रमित वान तयार न करता उस्मानाबादी शेळी पालनावर भर दिला.कारण उस्मानाबादी शेळ्यांना सर्वात जास्त मागणी आहे.साथीच्या आजारांना बळी पडत नाहीत.चारा हिरवा असेलतर हिरवा खातात नसेलतर वाळला चाराही खातात त्यामुळे उत्पन्न सर्वात जास्त मिळते.
तानाजी खंडागळे,संचालक-शामला गोट फार्म,तावडी
आजच्या तरुणांनी या व्यवसायात जरूर पडावे.यात वेळ दिला तर करोडो रुपये कमवू शकता.आमचे शेळी पालनाचे शेड ५०० शेळ्यांच्या कॅपॅसिटीचे आहे.सध्या आमच्याकडे १५० शेळ्या आहेत.लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात शेळ्यांची विक्री होऊन वर्षाचे उत्पन्न तीन महिन्यात भेटले.
परमेश्वर खंडागळे,तावडी शामला गोट फार्म
सर्वाेच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर ताशेरे