22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसोलापूरकोरोनासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीचा प्रयोग यशस्वी

कोरोनासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीचा प्रयोग यशस्वी

एकमत ऑनलाईन

बार्शी (विवेक गजशिव) : सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णावरील उपचारांमध्ये सर्वप्रथम मोनोक्लोनल अँटीबॉडीचा यशस्वी प्रयोग बार्शी येथील डॉ.संजय अंधारे यांनी त्यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या करून दाखवला आहे. आज पर्यंत सुश्रुत हॉस्पिटल मध्ये एकूण पाच रुग्णांवर या कोरोनाच्या आधुनिक उपचार पद्धतीचा यशस्वी उपचार करून घरी पाठवले आहेत. व आणखीन दोन रुग्णांचे या आधुनिक उपचार करण्याचे योजिले आहे. कारोनाच्या या आधुनिक उपचार पद्धतीचे कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत तर उलट याचा अवलंब केल्यानंतर रुग्णांच्या प्रकृतीमध्ये खूप झपाट्याने सुधारणा होताना दिसून येत आली.ही आधुनिक उपचार प्रणाली करोना रुग्णांकरिता खूपच कारीगर सिद्ध होताना दिसत आहे.

याविषयी अधिक माहिती देताना डॉ संजय अंधारे म्हणाले,या मोनॉक्लोनाल अँटीबॉडी म्हणजे माणसांनी कृतीम रीत्या तयार केलेले प्रोटीन आहेत. या अँटीबॉडीज रुग्णांच्या शरीरामध्ये इंजेक्ट केल्यानंतर त्या कारोना व्हायरसला निष्क्रिय करतात. या मोनॉक्लोनाल अँटीबॉडीज बारा वर्षे वरील सर्व कोवीड रुग्णांमध्ये वापरता येऊ शकतात.ज्या रुग्णांना नुकतीच कोरोना आजाराची लागण झाली आहे व अगदी साधारण ते मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसत आहेत,अशा रुग्णांमध्ये याचा खूप चांगला उपयोग होताना दिसत आहे. जे रुग्ण पूर्वीच्या काही असाध्य आजाराने ग्रासलेले आहेत. (उदा. डायबिटीस) असे रुग्ण ज्यांना करोना संसर्गाचा तीव्रता अधिक होण्याची शक्यता आहे अशा सर्व रुग्णांमध्ये या आधुनिक उपचार पद्धतीचा वापर करता येतो.

कोविड उपचार प्रणाली मधील आत्तापर्यंत च्या सर्व उपचार पद्धती मधील सर्वात विशिष्ट औषधांमध्ये याची गणना केली गेली आहे.कारण या औषधाचे रिझल्ट खूप आशादायक व विश्वासदायक आहेत. या आधुनिक उपचार पद्धतीचे फायदे पण खूप आहेत रुग्णांना इंजेक्शन देण्यासाठी लागणारा वेळ फक्त 30 मिनिटाचा आहे परंतू निरीक्षणासाठी हॉस्पिटल मध्ये कमीत कमी 24 तास ठेवण्यात येते. त्यामुळे अर्थातच हॉस्पिटलमधील रुग्णांचा मुक्काम फक्त एका रात्रीचा असेल.त्यामुळे हॉस्पिटलचे बिल हे पण अगदी नगण्य असेल. व या आधुनिक उपचारा बरोबर रुग्णांना इतर अँटिबायोटिक्स व स्टिरॉइड्स देण्याची बिलकुल गरज नाही, त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यताच नाही.त्यामुळे रुग्णांचा वेळ, औषधांवरील खर्च, हॉस्पिटलच्या बिलाचा भार खूप कमी होणार आहे.

म्हणूनच या मोनोकलोनल अँटीबॉडीज ला कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयोग करण्यात आलेला सर्वात प्रगत व खात्रीशीर औषध म्हणता येईल.म्हणूनच शक्य तेवढे लवकर कोरोना आजाराचे निदान करून योग्य व आधुनिक उपचार पद्धतीचा वापर केला तर आपण नक्कीच कोरोना आजाराला अगदी पहिल्या टप्प्यामध्येच सहज हरवू शकतो.असे डॉ अंधारे म्हणाले.

ओबीसी आरक्षणासाठी रास्तारोको आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या