20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeसोलापूरउद्योजक शीतल जानराव यांचा यशस्वी प्रवास

उद्योजक शीतल जानराव यांचा यशस्वी प्रवास

एकमत ऑनलाईन

बार्शी (विवेक गजशिव) : आज राजकरणात पडल्यामुळे कित्येक तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी तर काहींचं सोनं होत आहे.परंतू ही कथा आहे बार्शी तालुक्यातील पांगरी गावच्या जिल्हा परिषद निवडणुकीत अवघ्या 62 मतांनी पराभव झाल्यामुळे राजकारण सोडून उद्योगात यश मिळवणा-या उद्योजक शीतल जानराव यांची.जानराव यांचे शिक्षण एम.ए इंग्रजी,बी.एड,एम.फील होऊनही ठेकेदारीचा व्यवसाय का निवडला ? त्यासाठी आपण अगोदर त्यांची शैक्षणिक जडणघडण जाणून घेऊ.

उद्योजक जानराव यांचे मूळगाव बार्शी तालुक्यातील पांगरी त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षणही पांगरीतच झाले.12 वीचे शिक्षण झाडबुके यांच्या बार्शी कॉलेजमध्ये तर बी.ए आणि एम.ए कोल्हापूर येथे पूर्ण केले.यावेळी बी.ए मध्ये टॉपर असल्यामुळे बाळासाहेब खर्डेकर पुरस्कार देऊन कॉलेजने त्यांना सन्मानित केले.जानराव हे कॉलेजच्या मराठी साहित्य मंडळाचे 2 वर्ष अध्यक्षही होते.2002 ला एम.ए उत्तीर्ण होऊन विद्यापीठाचा ‘बेस्ट स्टुडंट’ हा किताबही त्यांनी पटकाविला होता.

त्यानंतर 2003 ला जानराव यांनी जिथे बी.ए चे शिक्षण पूर्ण केले होते तिथेच एक वर्ष इंग्रजी या विषयात अध्यापनाचे देखील काम केले.2004 साली बी.एड चे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी नेता म्हणून जानराव यांचे विद्यापीठासमोर 5 दिवस आमरण उपोषण – जानराव हे बी. एड ला असताना कॉलेजचे सी.आर म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत होते. अचानक कॉलेज आणि शिक्षक यांच्यामध्ये शिक्षकांच्या पगारीमुळे वाद पेटला आणि तो न्यायालयापर्यंत गेला त्यामुळे कॉलेजमधील 100 विद्यार्थ्यांच्या परिक्षाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर विद्यापीठासमोर 5 दिवस आमरण उपोषण करून विद्यार्थ्यांचा परीक्षेचा मार्ग जानराव यांनी सुकर केला होता. एकंदरीत कॉलेज जीवनापासून लढण्याची धमक आणि वृती असल्यामुळे जानराव यांनी 2007 साली पांगरी गण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आरक्षण पडल्यामुळे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर प्राध्यापक म्हणून दोन वर्षे कॉलेजला नोकरी केल्यानंतर गावातील जिल्हा परिषदेच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.घरच्यांची इच्छा नसताना निवडणूक लढविल्यामुळे घरच्यांनी घराबाहेर हाकलूनही दिले होते.त्यानंतर जानराव हे गावातल्या पाण्याच्या टाकिवर दोन-तीन दिवस झोपले.मात्र निवडणूक लढविण्याची जिद्द असल्यामुळे निवडणूक लढविली मात्र अवघ्या 62 मतांनी पराभव झाला अन राजकारणाला कायमचा रामराम ठोकला तो आजपर्यंत.

निवडणुकीत पराभव झाल्यामुळे पुन्हा नोकरी करायचे नाही ठरवले त्यामुळे 2008 साली शेतीकडे वळालो,दोन एकरात द्राक्ष बागायत शेती केली आणि शेतीही नुकसानीत गेली त्यामुळे पुन्हा शेती व्यवसायही करायचा नाही ठरवले आणि ठेकेदारी व्यवसायात उतरलो आणि आयुष्याचे सोने झाले.यशाचे खरे सूत्र सापडले. इतक्या मोठ्या अनुभवाच्या शिड्या चढल्यानंतर शीतल जानराव हे यशाच्या जवळ पोहोचले.ठेकेदारीला सुरवात केल्यानंतर सुरवातीला त्यांना मोबाइल टॉवर उभारणीचे काम मिळाले.या कामामध्ये क्वालिटी दिल्याने रेल्वेचे काम मिळाले आणि जिल्ह्यात रेल्वे कॉन्ट्रक्टर म्हणून शीतल जानराव यांचे नाव परिचित झाले.यात त्यांनी मिरज-पंढरपूर लाईन,मोठमोठी रेल्वे ब्रिज,पुलाचे कामे त्यांनी केली.सोलापूर,पुणे डिव्हिजनचे असंख्य कामे केली.आज जानराव यांचा वार्षीक 12 कोटींचा टर्न ओव्हर जरी दिसत असला तरी त्यामागे जानराव यांच्या 10 वर्षाच्या संघर्षाची गाथा आहे.

सात ऑक्सिजन प्लांट्स उभरणीला गती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या