19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeसोलापूरकरमाळा तालुक्यातील ऊस कारखानदारी वाचायला हवी कि वाटायला हवी ?

करमाळा तालुक्यातील ऊस कारखानदारी वाचायला हवी कि वाटायला हवी ?

एकमत ऑनलाईन

प्रा. राजेश गायकवाड करमाळा :करमाळा तालुका तसा सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त अंतर असणारा तालुका आहे .तालुका तसा पहिला तर सध्याच्या परिस्थितीत निम दुष्काळी मनले तर वावगे ठरणार नाही .तालुक्यामध्ये राजकारणाचा मोठा अड्डा व विकासाचा मात्र मोठा खड्डा अशीच काहीशी परिस्थिती आहे . इतिहास पहिला तर तालुका वासीयांच्या पदरी नेहमीच घोर निराशा पडली आहे .शेजारील तालुके पहाता कर्जत,माढा, जामखेड,परांडा,भूम आदी भागात कायमच्या दुष्काळी परिस्थितीत असतानाही विकास घडवून आणला आहे .मग तो शैक्षणिक असेल,सहकारीक्षेत्र असेल अथवा सामाजिक असो.

आमच्या करमाळा तालुक्यात तसा विकास का होत नाही हा एक सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न दिसतो आहे .तशी तालुक्यातील जनता हि खूप हुशार आहे ,प्रत्येक वेळी भाकरी पालटली पाहिजे असे प्रयोगही येथील जनता करून बसली आहे . करमाळा तालुक्यामध्ये तसे सहकाराचे सहकार क्षेत्रात काम करत असणारी ही मंडळी कमी नाही .दोन सहकारी साखर कारखाने काढले आहेत ,विविध संस्था स्थापन केलेल्या आहेत .पण प्रत्यक्षात मात्र मनावे तेवढे यश कोणालाही मिळालेले नाही हे तितकेच खरे.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना ,श्री मकाई सहकारी साखर कारखाना, श्री भैरवनाथ विहाळ, श्री कमला भवानी पांडे असे एकूण चार कारखाने पहावयास मिळतात .त्यामध्ये कमला भवानी व भैरवनाथ हे खाजगी मालकीचे आहेत .
शेजारच्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर ,विना सहकार नाही उद्धार या म्हणी प्रमाणे तेथील जनतेचा विकास घडवून आणला आहे .सहकार क्षेत्रात पहिला साखर कारखाना विखे पाटील यांनी काढून चालऊन दाखविला आहे .तसा प्रयत्न माढा तालुक्यात श्री विठ्ठलराव शिंदे हा सहकारी साखर कारखाना मोठ्या जोमाने चालतो आहे.

आमच्याच आदिनाथाला काय झाले हे समजत नाही .संचालक मंडळ दरदिवशी वेगळ्या नेते मंडळींना भेटून आमचा कारखाना चालवा असे म्हणत दारोदारी भटकत आहेत. या सारखे दुर्दैव असू शकत नाही .मग ही मंडळी कारखाना वाटायला निघाली कि वाचवायला असा प्रश्न येथील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मनात घर करून बसला आहे .विकासाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असणारे क्षेत्र म्हणजेच सहकार क्षेत्र होय पण ही मंडळी विसरली कि काय .निवडणुकीच्या निमित्ताने हेच संचालक आम्ही कारखान्याचा विकास करू,सर्वात जास्त भाव देऊ,कामगारांचे प्रश्न सोडवू अशी प्रचार करत गावोगावी फिरत होती ,आता त्याचे काय कुठे गेला विकास,कुठे गेला जास्त भाव ?असा प्रश्न सभासदामधून विचारला जात आहे.

यावर्षी पाऊस पडला आहे ऊस लागवड भरपूर प्रमाणात होत आहे .पण तालुक्यातील शेतकरी मात्र शेजारच्या वाढप्याकडेच मोठ्या आशेने पहात आहे .आपल्यापेक्षा दुस-याचे च चांगले मानण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आली असे वाटायला वेळ लागणार नाही हे तितकेच खरे .खंबीर नेतृत्व,खंबीर साथ , खंबीर पाठबळ व गॉडफादर असल्याशिवाय हे शक्य नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

सध्या उजनी धरण भरत आहे,सीनाकोळगावच्या धरणात पाणी वाढत आहे .मांगी तलावात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत .दहीगाव योजना कार्यान्वित करण्यात येत आहे .त्यामुळे भौगोलिक परिस्थिती बदलली आहे तसे नेते मंडळींनी हि या संधीचा लाभ घ्यावा तेवढा कमीच आहे.

राजनाथ सिंह : फक्त ‘मेक इन इंडिया’ नव्हे ‘मेक फॉर वर्ल्ड’चं लक्ष्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या