पांगरी : घरगुती भांडणाच्या कारणावरून सॅनिटायझर पिले . पोलिस ठाण्याच्या पाठीमागे जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आदीत्य दिंगबर घोडके (वय २७, रा. घारी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या तरुणाचे नाव आहे. त्यास बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
घरगुती भांडणाच्या किरकोळ कारणावरून पोलिस ठाण्यात पत्नीसमवेत तक्रार देण्यास आलेल्या तरुणाने पांगरी ठाण्याच्या पाठीमागील बाजूस जाऊन सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. रविवार दि. १४ मे रोजी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश संतराम कोठावळे यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. आदित्य घोडके याने गावातील एका तरुणीबरोबर नऊ महिन्यापूर्वी आळंदी येथे पळून जाऊन लग्न केले. दहा दिवसापूर्वी घारी येथे आले होते.
रविवारी सकाळी नऊ वाजता घरी असताना पत्नीच्या वडिलांबरोबर किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर आदित्य व त्याची पत्नी हे दोघे पांगरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. पत्नीस ठाणे अंमलदार कक्षात बसवून तो बाहेर गेला. त्यानंतर आदित्य घोडके याने पोलिस ठाणेच्या पाठीमागील लावलेल्या टेम्पोच्या पाठीमागे जाऊन सॅनिटाझर औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.