37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeसोलापूरघरच्यांना प्रेमसंबंध कळतील या भीतीपोटी प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

घरच्यांना प्रेमसंबंध कळतील या भीतीपोटी प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

एकमत ऑनलाईन

मोहोळ :  चुलत भाऊ बहीणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घडना सोहाळे ता मोहोळ येथे घडली दोघा प्रेमीयुगुलानी घरच्या नां प्रेमसंबधाची माहीती कळेल या भीतीने आत्महत्या केली नरखेड ता मोहोळ येथे अल्पवयीन  मुलानी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना ही घडना घडल्याने  मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत कामती पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार रामचंद्र ज्ञानेश्‍वर रामचंद्र बचुटे वय वर्ष २० रा . सोहाळे तालुका मोहोळ व त्याची एक वर्षानी मोठी असलेली चुलत बहीण लग्न होऊन सासरी गेलीली पूजा प्रवीण बचुटे पाटील वय २२ रा.नागज फाटा सांगोला  त्याचे प्रेम जुळले मात्र आपल्या नात्याला विरोध होणार याची कल्पना त्यांना आली आणि त्यांनी आत्महत्या केली  प्रेमात नाहून निघालेल्या दोघांना  समाज या गोष्टीला मान्यता देणार नाही हे उमगले.

आणि हे प्रकरण कळताच दोघांच्याही घरातून त्यांच्या प्रेमाला विरोध होऊ लागला ही घटना दोघांच्या घरी समजल्यानंतर समाजात नावे ठेवून घ्यावे लागेल  झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणत आई वडिलांनी मुलीचा विवाह सांगोला तालुक्यातील पाटील घराण्यात लावून दिला हे लग्न मुलीला मान्य नव्हते  परंतु आई  वडिलांन व नातेवाईक यांच्या समोर तिचे काही चालले नाही म्हणून ती गप्पच राहिली लग्न झाले सासर अनुभवल रिवाजाप्रमाणे येती जाती साठी पूजा पाटील माहेरी सोहाळे येथे  आली पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या दोघे परत एकत्र आले व आता आपणास समाज व नातेवाईक एकत्र येऊ देणार नाहीत असे समजून दोघांनीही सोहाळे गावच्या शिवारातच माणिक महादेव बचुटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये शनिवारी रात्री दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

माणिक बचुटे हे रविवारी सकाळी आपल्या शेतामध्ये गेले असता यांच्या निदर्शनास ही घटना आली त्यांनी कामती पोलिस ठाण्यात  खबर दिली  या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण उंदरे हे पुढील तपास करीत आहेत. नरखेड ता मोहोळ येथे प्रेमीयुगुलाची आत्महत्या होऊन चार दिवसाचा कालावधी उलटला नाही  आणि ते देखील दोघेही एकमेकांचे मावस बहीण भाऊ होते असे समझले.

पावसाचे भयंकर तांडव; अख्खं गाव गेलं पाण्याखाली!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या