31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeसोलापूरऊस दरासाठी स्वाभिमानी आक्रमक

ऊस दरासाठी स्वाभिमानी आक्रमक

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : सोलापूर जिल्हयातील साखर कारखाने सुरु होवून दोन महिन्याचा कालावधी संपत आला तरी अदयाप कुठल्याही कारखान्याने एफ.आर.पी.रक्कम जाहिर न केल्याने संतापलेल्या मंगळवेढा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी मरवडे येथे रात्रीच्यावेळी ऊसाने भरून जाणारी वाहने पेटवून देण्याचा प्रकार घडल्याने ऊस दराची ठिणगी पडली आहे.

सोलापूर जिल्हयातील साखर कारखाने ऑक्टोबर महिन्यात सुरु झाले. जवळपास दोन महिन्याचा कालावधी संपत येवूनही कुठल्याच साखर कारखान्याने यंदाच्या गाळपास येर्णा­या ऊसाचा दर एफ.आर.पी.प्रमाणे जाहिर केला नाही. परिणामी शेतकरी वर्ग आपल्या उत्पादित ऊसाला किती दर मिळणार याबाबत संभ्रमात आहे. सहकार क्षेत्रातील कारखानदार मात्र याबाबत एकाग्रता पाळून तोंडावर बोट ठेवून ऊस गाळप करण्यात व्यस्त आहेत.मंगळवेढा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होवून ऊसाने भरून लवंगी येथील भैरवनाथ कारखान्याकडे जाणारी वाहने रविवारी रात्री 11.00 वा.थांबवून पेटवून देण्याचा प्रकार घडला.वाहने पेटविण्याची प्रक्रिया सुरु असल्यामुळे इतर ऊस भरून जाणारे वाहन चालक जाग्यावर वाहने उभी करून सैरावैरा पळू लागली.मरवडे परिसरात मुख्य मार्गावर वाहनांची लांबलचक रांग लागल्याचे चित्र होते.

याबाबत मंगळवेढा पोलिस स्टेशनला समजताच सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे मध्यरात्री पोलिस कर्मर्चा­यांसह घटनास्थळी हजर झाले. पेटलेली वाहने विझविण्यात आली.या दरम्यान पोलिस आल्याचे पाहताच कार्यकर्त्यानी धूम ठोकली. दरम्यान,या घटनेबाबत पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्रीमंत केदार (रा.डोणज) व दत्तात्रय गणपाटील (रा.मरवडे) व इतर सहा कार्यकर्त्याविरूध्द भा.दं.वि.341,255,34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

ऊसदराची कोंडी कोण फोडणार? स्व. सुधाकरपंत परिचारक यांची उणीव भासू लागली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या