25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरमुळेगाव रोडवर तरूणावर तलवार हल्ला, गुन्हा दाखल

मुळेगाव रोडवर तरूणावर तलवार हल्ला, गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : दुचाकीवरून हैदराबाद रोडवरून घरी जात असताना मुळेगाव रोड येथे सहा ते सात जणांनी मिळून तलवारीने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शुभम स्वामी हा तरुण गंभीर जखमी झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला कशामुळे झाला? याचा तपास पोलिस करत आहेत.

शुभम संजय स्वामी (वय २६ रा. कोडानगर, जुने विडी घरकुल) रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी निघाला मार्केट यार्डसमोरील रस्त्यावरून तो घरी जात होता. मुळेगाव रोडवर तो आला आणि ज्यूस पिण्यासाठी थांबला. ज्यूस पिऊन निघाला असताना सहा ते सातजणानी त्याला थांबवून रस्त्यावर तलवारीने वार केले.

काही तलवारीचे वार त्याच्या डोक्यावर आणि पोटात खोलवर बसल्यामुळे तो गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे.त्याच्या दोन मीत्रांनी त्याला आपल्या दुचाकीवर घेऊन उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

सिव्हिल पोलिस चौकीच्या नोंदीत स्वप्नील देढे, विशाल शिंदे सार्थक माने यांच्यासह इतर तीन ते चार जणांनी हल्ला केल्याची नोंद आहे. हल्ला किती जणांनी केला ,का केला? याचा शोध पोलिस घेत आहेत.

आरोपींच्या तपासासाठी दोन पथके सोलापूरबाहेर रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजन माने यांनी दिली. . शुभम याला शासकीय रूग्णालयातून खासगी रूग्णालयात हलवण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी त्याची भेट घेऊन विचारपूस केली.

शुभम हा लॅब टेक्निशियन होता. काही दिवसांपूर्वी त्याने हे काम सोडले होते. त्याचा मोठा भाऊ फायनान्समध्ये कामाला आहे. वडील मिठाई दुकानात कामाला आहेत. आई गृृृृहीणीआहे. काही दिवसांपूर्वीपासून त्याची मित्र मंडळी वाढत होती. त्यामुळे अनेकजण मानत होते. काही महिन्यांपूर्वी शुभम आणि काही मित्रांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर वातावरण शांत झाले असताना अचानक हा हल्ला झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या