27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeसोलापूरमराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू -आमदार राम सातपुते

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू -आमदार राम सातपुते

एकमत ऑनलाईन

अकलूज (प्रतिनिधी )सरसकट मराठा समाज सधन नसून, विदर्भ, मराठवाडामध्ये मराठा समाजाची अवस्था अतिशय दयनीय आहे. यासाठीच शैक्षणिक आणि नोकऱ्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे मराठा समाजातील युवकांना शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. यासाठी आता रस्त्यावरील लढाईची तयारी करून प्रसंगी तालुक्याचा आमदार म्हणून मी सर्वात पुढे असेल अशी ग्वाही आ. राम सातपुते यांनी अकलूज येथे सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने निवेदन स्वीकारताना दिली.

आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये रोष वाढला असून, कोर्टाने दिलेली स्थगिती त्वरित उठवण्यात यावी व आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, आज 21 सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. त्यास माळशिरस तालुक्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जय शंकर उद्यान अकलूज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीरशैव लिंगायत समाज, दलित महासंघ ,युवा सेना ,योद्धा प्रतिष्ठान, विश्वकर्मा युवक संघटना भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आदी समाज संघटनांच्यावतीने मराठा आरक्षणाची पाठिंब्याची पत्रे सुपुर्द करण्यात आली.

सकल मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुका 100% कडकडीत बंद करण्यात आला असून, नातेपुते ,माळशिरस ,वेळापूर ,अकलूज व पिलीव या प्रमुख गावांसह तालुक्यातील छोट्या-मोठ्या गावात ही 100% कडकडीत बंद पाळून आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला होता. प्रारंभी महिला भगिनीच्या हस्ते जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी अकलूज चे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका विशद केली. तर शाहीर राजेंद्र कांबळे ,शेखर खिलारे ,श्रीनिवास कदम पाटील, प्रिया नागणे ,धनंजय साखळकर, नानासाहेब वरकड, नागेश काकडे ,लक्ष्मणराव आसबे आदींनी आरक्षणा संदर्भात आपली भूमिका विशद केली. प्रास्ताविक उत्तमराव माने शेंडगे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निनाद पाटील यांनी मानले.

पत्नीची हत्या केली आणि तिचे डोके मांडीवर घेऊन रात्रभर रडत बसला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या