अकलूज, दि, ८ – मराठा समाजाचा आक्रोश ऐकुन न ऐकल्यासारखे करणाऱ्या सरकारचे कान उघङण्यासाठी आज सकल मराठा समाजातर्फे टाळ-मृदुंग मोर्चा आणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ती स्थगिती उठेपर्यंत एमपीएसी परिक्षा व पोलीस भरती व सर्व शासकिय नोकर भरत्या पुढे ढकलण्यात याव्यात अशा मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्यांना देण्यात आले.
विजय चौकातील जयशंकर उद्यानातील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चास सुरुवात करण्यात आली. विजय चौक, गांधी चौक, सदुभाऊ चौक मार्गे टाळ-मृदुंगाच्या गजरात सकल मराठा समाजातील कार्यकर्ते प्रांताधिकारी कार्यालयात पोहोचले. तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजातील शेकङो कार्यकर्ते उपस्थित होते.