सोलापूर : शेतात विहीर नसल्याची नोंद घेऊन ७/१२ उतारा देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तलाठ्याची जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली.
यांनी गट क्र. १८ या शेत जमिनीमध्ये विहीर नसल्याबाबत नोंद घेऊन ७/१ उतारा देण्याची मागणी केली होती. उतारा देण्यासाठी तलाठी विजय पवार यांनी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. बंडय्या स्वामी यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. अक्कलकोट येथील तलाठी कार्यालयात लाच घेताना रंगेहा पकडण्यात आले होते. याप्रकरण आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्रा धरून न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी आरोपीतर्फे अॅड. राहुल खंडाळ तर सरकारतर्फे विजय शालिग्राम पवार (रा. अक्कलकोट) असे निर्दोष झालेल्या तलाठीचे नाव आहे. तक्रारदार बंडय्या विरपाक्षय्या स्वामी (रा. अक्कलकोट) अॅड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले.