36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeसोलापूरटेंभुर्णी बस स्थानकावरून महिलेचे दागिने लांबवले

टेंभुर्णी बस स्थानकावरून महिलेचे दागिने लांबवले

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/टेंभुर्णी
टेंभुर्णी येथील बस स्थानकावरून प्रवासी महिलेच्या पर्समधून १ लाख ९५ हजार रुपयाचे दागिने लांबवल्याची घटना घडली असून याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की तेजमाला काकासाहेब मुटाळ (वय ३७) रा.खामगाव तालुका बार्शी या पती, सासू-सासरे व दोन मुलींसोबत श्रीपुर वरून टेंभुर्णी या ठिकाणी बार्शीला जाण्यासाठी आल्या होत्या.

टेंभुर्णी येथून पुणे-औसा बस मध्ये चढल्यानंतर तेजमाला मुटाळ यांनी तिकीट काढण्यासाठी कंडक्टरला तिकिटाचे पैसे देण्यासाठी पर्सचे मध्ये पाहिले असता त्यांना पर्समध्ये छोट्या पाकिटात ठेवलेले ३ तोळ्याचे सोन्याचे गंठण, १ तोळ्याची सोन्याची चैन तसेच कानातील कर्णफुले व इतर सोन्याचे दागिने ठेवलेले छोटे पाकीट त्या पर्समध्ये नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी टेंभुर्णी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध १ लाख ९५ हजार रुपयेकिंमतीचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद दिली असून तपास पोलीस हेकॉ. गोळे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या