सोलापूर : कुंभारी रोडवरील विजयनगर येथील पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या इराबत्ती टेक्सटाईलला मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत कारखान्याच्या तळमजल्यावरील सर्व कच्चा व तयार माल, मशीन जळून खाक झाले आहे. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ५० गाड्यांचा फवारा करावा लागला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
श्रीहरी इराबत्ती यांच्या इराबत्ती टेक्सटाईलमध्ये मंगळवारी सायंकाळ अचानक आग लागली. यावेळी काही
कामगार कारखान्यात होते. तेव्हा अचानक आग लागली. आग पाहून कामगार पळत बाहेर आले. दरम्यान तेथील अमर बुक्कानुरे यांनी व इतर नागरिकांनी पोलिस चौकीला व अग्निशामक दलाला फोन करत घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक
दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अग्निशामक दलाच्या जादा गाड्या बोलवत पाण्याचा सर्व बाजूंनी फवारा करण्यात आला. या आगीत पीफओ मशीन, टेरी टॉवेल कच्चा व पक्का माल आदी माल जळून खाक झाला.