31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeसोलापूरशेकडो अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन

शेकडो अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन

एकमत ऑनलाईन

सोलापूर : अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले आहे. अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्या आणि त्यांनी थाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. करोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळ्या वाजवा असे आवाहन केले होते. थाळ्या वाजवून करोना तर गेला नाही. पण याच थाळ्यांच्या आवाजाने राज्य सरकार व केंद्र सरकारला जाग येईल, असे अंगणवाडी सेविका संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका या शासकीय सेवेपासून वंचित आहेत.

शासनाकडे अनेकदा निवेदने दिली. आंदोलन केले, तरीही शासनाला जाग येत नाही. शासनाला जाग यावी म्हणून आम्ही थाळ्या वाजवून आंदोलन करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. अंगणवाडी सेविकांना ऑनलाइनरित्या इंग्रजीमध्ये माहिती भरावी लागते. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा इतर मंत्र्यांना मराठी भाषेचा अभिमान नाही, असे वाटत आहे. कोर्टाचे कामकाज मराठी भाषेत सुरू आहे. पण अंगणवाडी सेविकांना आजही इंग्रजी भाषेत माहिती भरण्यास भाग पाडले जात आहे. इंग्रजी भाषेची सक्ती केली जात आहे.

कर्नाटक राज्यातील अंगणवाडी सेविका कन्नड भाषेत कामकाज पाहतात. मध्य प्रदेश राज्यातील अंगणवाडी सेविका हिंदी भाषेत कामकाज पाहतात. मग महाराष्ट्र राज्यात मराठी ऐवजी इंग्रजी भाषेची सक्ती का केली जात आहे? असा सवाल थाळ्या वाजवणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे.

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना जावा, यासाठी थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. पण आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी थाळ्या वाजवत असल्याचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या