37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeसोलापूरअकलूज येथे जनसेवा संघटनेच्या महिलांचे थाळीनाद आंदोलन

अकलूज येथे जनसेवा संघटनेच्या महिलांचे थाळीनाद आंदोलन

एकमत ऑनलाईन

अकलूज, दि. २५ – मार्च २०२० पासून कोरोना आजाराच्या त्रासदीमुळे आमचे व्यावसाय बंद पडले आहेत. जगणं मुश्किल झालयं. घरात खायला भाकरी नाही. अशी आमची बिकट अवस्था असताना आम्ही वीज बिल कोठून भरणार. बँकांचे हप्ते कसे भरणार असा सवाल करत जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्यच्यावतीने महिलांनी थाळीनाद करत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अकलूजच्या दारात वीज बिलांची होळी केली.

गांधी चौक, अकलूज येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला व सहकार महर्पुषींच्या पुतळ्याला ष्पहार अर्पण करून थाळीनाद मोर्चाला सुरूवात झाली. हातातल्या थाळ्या वाजवत विज बिल माफ करा, बँकांची कर्जे माफ करा अशा घोषणा महिला देत होत्या. घरातील कर्त्या पुरूषांच्या हाताला काम नाही. आम्ही बचत गटांची कर्जे घेऊन छोटे छोटे व्यावसाय सुरू केले होते. परंतु मार्च महिन्यापासून टाळेबंदी सुरू झाली आणी आमचे व्यावसाय मोडीत निघाले.

आता परिस्थिती निवळली असली तरी व्यावसाय मात्र बंद पडलेलेच आहेत. होती नव्हती ती शिल्लक टाळेबंदीच्या काळात खर्चून गेली. भांडवल जिरले. आता हजारोंच्या पटीत आलेले वीज बील कसे भरणार. बचत गटांची घेतलेली कर्जे कशी फेडणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या फक्त आमचीच नसुन महाराष्ट्रातील संपुर्ण गरीब कुटूंबांची आहे. त्यामुळे आमचे विज बिल व बचत गटांची, मायक्रो फायनान्सची, बँकांची कर्जे माफ होऊन आम्हाला जगण्याची संधी द्यावी असे निवेदन महावितरण, फायनान्स कंपन्या आणि प्रांताधिकारी कार्यालयास देण्यात आले आहे.

यावेळी जनसेवा संघटना महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योती कुंभार, शहराध्यक्ष शांताबाई शहापुरे, माढा जनसेवा संघटनेच्या अध्यक्षा सारीका ननवरे, वर्षा सटाले, सरस्वती पवार, सुनिता सुरवसे, वर्षा चंदनशिवे, मनिषा काळे माधुरी वाघचवरे सविता शिंदे लक्ष्मी सगर शांता शाहपूरे वषाँ साठे मनिषा साठे सुधीर रास्ते मयुर माने व शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या.

बिहारमध्ये ‘पोस्टर वॉर’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या