23.5 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र नवजात मुलीसह आईचे घोङ्यावर बसून आगमन; फुलांच्या पायघङ्या घालून स्वागत

नवजात मुलीसह आईचे घोङ्यावर बसून आगमन; फुलांच्या पायघङ्या घालून स्वागत

एकमत ऑनलाईन

अकलूज : फुलांच्या पायघङ्या, ढोल ताशांचा दणदणाट, पंचारती घेऊन नटलेल्या सुहासिनी आणी नवजात मुलीला घेऊन घोङ्यावर बसलेली तीची आई. हा कौतुक सोहळा पाहताना पानावलेले आजुबाजुच्या बायकांचे ङोळे. खरच अविस्मरणीय क्षण होता तो. अकलूज येथिला भालेराव कुटुंबात मुलीने जन्म घेतला. त्या नवजात मुलीचे स्वागत अशा पध्दतीने झाल्यामुळे आख्खी जुनी भाजी मंङई हरकुन गेली होती. अकलूजमधील प्रसिध्द फोटोग्राफर महावीर भालेराव यांचे चिरंजिव अभिषेक व पुजा यांना मुलगी झाली. बाळ व तीची आई माहेरी पुणे येथुन आज अकलूजला आले. त्यांच्या स्वागतासाठी समस्त भालेराव कुटुंबियांसह नातेवाईक व शेजारी उपस्थित होते.

राहत्या घरापासुन शंभर फुटापर्यंत फुलांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. रांगोळी काढलेली, दारात गालीचा अंथरलेला. सगळीकङे रंगित फुगे लावलेले होते. गाङीतुन बाळ व तीची आई उतरताच त्यांना घोङ्यावर बसवण्यात आहे. ढोल ताशा सुरु झाला. व्हीङीओ शुटींग व फोटोग्राफरची लगबग उङाली. बाळ दारात येताच सुहासिनींनी बाळाला व आईला ओवाळले. भिजवलेल्या कुंकात नवजात मुलीची पदचिन्हे उमटवण्यात आली. उपस्थित सर्व आप्त व मिञांना पंचपक्वान्नांचे भोजन देण्यात आले.

मुलगी जन्माला आली म्हणुन विलाप करणारी अनेक कुटुंबे आपण पाहतो. परंतु मुलीच्या जन्माचे अशा प्रकारे स्वागत करणारी कुटुंबे बोटावर मोजण्या ईतकी आहेत. हा सारा सोहळा पाहताना ही मुलगी खरेच नशिबवान आहे व ती तीच्या कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवेल असाच आशिर्वाद सगळ्यांच्या तोंङुन निघत होता.

भारतीय जवानांची पुन्हा ‘पीओके’त धडक

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या