25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसोलापूरमानेगावजवळ मृतदेह आढळला

मानेगावजवळ मृतदेह आढळला

एकमत ऑनलाईन

बार्शी : बार्शी येथील आचारी म्हणून व्यवसाय म्हणून काम करीत असलेले विष्णुपंत बारंगुळे (वय ५०, रा. जैन मंदिराजवळ) हे दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. सोमवारी रात्री त्यांचा मृतदेह सोलापूर रोडवरील मानेगावजवळ आढळला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सोमवारी रात्री त्यांचा फोटो मोबाइलवर व्हायरल झाल्यानंतरच त्यांच्या नातेवाइक कुटुंबीयांना त्यांच्या मत्युची बातमी समजली. याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णुपंत बारंगुळे हे दोन दिवसांपूर्वी घरातून गेले होते. अधूनमधून ते असं जात असल्याने त्यांच्याकडे घरातील कोणी लक्ष दिले नाही. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांच्या चेहर्‍यावर जखमा झालेल्या शरीराची कोणतीही हालचाल नसलेल्या अवस्थेत मानेगावजवळ एक व्यक्ती पडल्याबाबत फोटो व्हायरल करण्यात आल्यानंतर त्यांच्या मुलास ही माहिती मिळाली. वडील असल्याची खात्री झाल्यानंतर घटनास्थळी जाऊन त्यांना वैराग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मृृृत घोषित करण्यात आले

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या