27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeसोलापूरओटीपी घेऊन बस कंडक्टरला दीड लाखाला घातला गंडा

ओटीपी घेऊन बस कंडक्टरला दीड लाखाला घातला गंडा

एकमत ऑनलाईन

मंगळवेढा : क्रेडिट कार्डावर वार्षिक विमा असून, त्या क्रेडिट कार्डाचे लिमिट वाढवायचे आहे, असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने ओटीपी नंबर घेऊन मंगळवेढा आगारातील एसटी बस कंडक्टर शशिकांत लक्ष्मण महामुनी (रा. भोसे) यांची एक लाख ४३ हजार ७८१ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शशिकांत महामुनी हे मंगळवेढा आगारात बस कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मोबाइलवरून एक कॉल आला. मी अग्निहोत्री, मुंबई येथील आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगण्यात आले. तुमच्या क्रेडिट कार्डावर २४९९ रुपयांचा वार्षिक विमा आहे. तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवायची आहे, असे फिर्यादीस सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि मोबाइलमध्ये आलेल्या ओटीपीची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीला दिली.

त्यानंतर क्रेडिट कार्डावरून पाच वेळा ट्रान्झेक्शन झाल्याचे मेसेज आले. पहिल्या ट्रान्झेक्शनला २३ हजार २३० रुपये, दुसऱ्याला २० हजार ६०३ रुपये, तिसऱ्याला २० हजार रुपये, चौथ्याला २५ हजार रुपये, पाचव्या ट्रान्झेक्शनला ५४,९४८ रुपये असे एकूण एक लाख ४३ हजार ७८१ रुपये काढून घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या