प्रतिनिधी / सोलापूर :
सोलापूर शहरात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे़ प्रशासनाकडून कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी निकराचे प्रयत्न होत असले तरीही वाढते रूग्ण संख्या या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे़ यंत्रणेतील त्रुटीमुळे कोरोना रूग्णांच्या वाढत्या सेंख्य्ेवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने कोरोनाबाधीत रूग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासंंबंधी वेळोवेळी सुचना व आदेश दिले आहेत़ या आदेशाचे उल्लंघन करित रूग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेच्या कोरोना टेस्टचा अहवाल येण्यापूर्वीच तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देवून संसर्गजन्य रोग पसरण्यास व इतरांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात घालण्यास कारणीभुत ठरलेल्या यशोधरा हॉस्पिटलच्या प्रशासनाविरूध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More शेतकऱ्यांना मिळणार ४ टक्के व्याजदराने कर्ज
सोलापुरातील कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होउ लागला आहे़ तो कमी करण्यासाठी मनपा व जिल्हा प्रशासन निकराचे प्रयत्न करित आहेत मात्र यशोधरा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे पॉझिटीव्ह महिलेचा मृतदेह अहवाल येण्यापूर्वीच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला़ नातेवाईकांनी नेहमीप्रमाणे अंत्यसंस्कार केले़ अंत्यसंस्काराच्या दुसºया दिवशी रिपोर्ट आला पॉझिटीव्ह़ कर्णिकनगर परिसरातील महिलेला सारीचा त्रास होउ लागल्याने यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
२६ मे ला त्या महिलेचा मृत्यू झाला़ तत्पूर्वी महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते़ त्याचा अहवाल येण्यापूर्वीच यशोधराच्या प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यता दिला़ २७ मे रोजी अंत्यसंस्कार झाले़ २८ मे ला महिला पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला त्यामुळे नातेवाईकांसह जिल्हा प्रशासनाचे झोप उडाली़ आता विलगीकरण कक्षात असलेल्या १९ व्यक्तींचे स्वॅब वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले जाणार असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.