25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeसोलापूरसतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र...

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

एकमत ऑनलाईन

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गेली तीन महीने छोटे मोठे व्यवसाय पुर्णपणे बंद होते या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे व्यवसाय धारकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

एखाद्या व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याणा ना कोणत्या बॅकाचे, पतसंस्थाचे कर्ज घेऊनच हा व्यवसाय सूरू केला जातो. दैनंदिन जो काही धंदा होतो त्यातील काही प्रमाणात पैसे पिगमी स्वरुपात दररोजच्या दररोज बॅकेत किंवा पतसंस्थेत प्रत्येक दुकानदार व्यवसाय धारक भरत असतो व उर्वरित पैसेतून आपली उपजिविका प्रपंच चालवतो ही व्यवसाय धारकांचा दिनक्रम असतो. पण गेली तीन महीने संपुर्ण देशासह राज्यात कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाउंन मुळे सर्व छोटे मोठे उद्योग धंदे बंद होते. त्यामुळे व्यवसाय धारकांचे खूप मोठे नुकसान झाले होते.

काही दिवसांपासून लाॅकडाउंन थिल करुन सर्व ठिकाणचे व्यवसाय-धंदे चालू करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी सुध्दा व्यवसाय पुर्व पथवर यालाला कितेक दिवस लागतील आज ही सर्व धंदे कमी प्रमाणात चालत आहे म्हणावे तशी बाजारपेठत ग्राहकांची म्हणावी अशी गर्दी दिसून येत नाही त्यामुळे सर्व धंदे 50% वर येऊन ठेपले आहेत त्यामुळे सध्या व्यवसाय धारकांचे धंदे पूर्णपणे कोलमडले आहेत व त्यामध्ये ही तीन दिवस, आठ दिवस बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारक जरीला लागला आहे त्यामुळे कमीत कमी 2 वर्ष तर व्यवसाय धारक वर येणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

त्यात बँक व पतसंस्थेचे घेतलेले कर्ज व त्याचे हप्ते कसे फेडायचे अशा प्रश्न निर्माण झाला आहे त्यातही सध्या सर्व धंदे स्लाक थंड असल्याने व्यवसाय धारक यांच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे तरी शासनाने छोटे-मोठे व्यवसाय धारकांना आर्थिक मदत किंवा पॅकेज जाहीर करून अडचणीच्या काळांमध्ये या व्यवसाया धारकांना पुन्हा उभारण्यासाठी पाठबळ द्यावे अशी व्यवसाय धारकातून मागणी होत आहे.

त्यातूनही तो सावरण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत आता ही तीन दिवस आठ दिवस जनता क्युफ्स लादून व्यावसाय धारकांचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश प्रत्येक गावपातळीवरील संबधित ग्रामपंचायत, नगरपालिका,महानगरपालिका यांच्या माध्यमातून काढले जात आहे . याविषयी शासकीय आधिकारी यांना विचारणा केली असता आम्ही कुठल्याही प्रकारचे गाव तालूका जिल्हा बंद करण्याचे लेखी अथवा तोंडी आदेश दिले नाहीत असे स्पष्ट बोलतात. हे बंद करण्या पाठीमागचा करता करीवता कोण? हा प्रश्न चर्चा बनला आहे. असे बंद करून व्यवसाय धारकांच्या जिवीताशी खेळणे कधी बंद होणार? अजून किती दिवस जिरवा जिरवीचे डाव खेळले जाणार हे देव जाणे.

सध्या सन 2020 वर्षा अखेर आले तरी ही बंद काही केल्या कमी होईना ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली केली की बंद, गावातील प्रतिष्ठित व्यक्तिंचा मुत्य झाला गाव बंद, गावात एखादी वाईट घटना घडली की गाव बंद, काहीही होऊ दे गाव बंद ही प्रथा झाली आहे. सध्या तर कोरोनाच्या नावाखाली बंद चे पेव फुटले आहे तीन दिवस बंद, आठ दिवस बंद या सर्वाचे खाप्पर व्यापारी छोटे मोठे दुकानदारच्या डोक्यावर का फोडता. हे कधी थांबणार? याला आळा बसणार का? यासाठी सरकारने अनुकूलता दर्शवून जाचक अटी लावून याला कायमस्वरूपी पायबंद घातला पाहिजे.

प्रत्येक गावोगावी शासनाने पाच दहा एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी सर्व महापुरुषांचे पुतळे बांधून त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला तर असे अनुचित घटना घडणार नाहीत. माणसा माणसातील, समाजा समाजातील वाद होणार नाहीत आणि हे वाद जर झाले नाहीत तर गाव तालूका जिल्हा बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यासाठी सरकारने ठोस अशी पावले उचलली पाहिजेत तरच बंद ला पायबंद लागेल अन्यथा नाही हेही तेतकेच खरे आहे. यासाठी सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे अशी व्यवसाय धारकांतून मागणी जोर धरु लागली आहे. छोटे मोठे व्यवसाय जर सुरळीत चालले तरच देशाची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसाय धारकांचे जीवनमान ही सुधारेल.

कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत होणारे गाव, तालूका, जिल्हा, महाराष्ट्र, बंद कोठे तरी थांबावा यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत. तरच अश्या प्रकाराला वेळीच पायबंद लागेल या दररोज होणाऱ्या बंदमुळे छोट्या-मोठ्या व्यवसाय धारकांचे कंबरडे मात्र मोडले आहे हे तितकेच खरे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या