31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसोलापूरधनगर आरक्षणासाठी पंढरीतून सायकल यात्रेची सुरुवात

धनगर आरक्षणासाठी पंढरीतून सायकल यात्रेची सुरुवात

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : महाराष्ट्र विकास आघाडी व सकल धनगर समाज यांच्यावतीने श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे या मागणीसाठी सकल धनगर समाज मराठवाडा विभागाचे विष्णू सायगुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोटर सायकल यात्रा काढून महाराष्ट्रातील २८८ आमदारांना भेटून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीचे निवेदन देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दुसरा टप्पा मोटरसायकली यात्राची सुरुवात पंढरपूर येथील तीर्थक्षेत्र विठ्ठल मंदिरापासून सुरुवात केली आहे.

गेल्या अनेक दशकापासून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून तो तातडीने मार्गी लावावा. या प्रमुख मागणीसाठी अनेक वेळा समाजाने मोर्चे, आंदोलने, लॉंग मार्च, धरणे आंदोलने केली मात्र राज्य सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे १९ नोव्हेंबर पासून पश्चिम महाराष्ट्रतून दुस-या टप्प्याचे मोटरसायकल यात्रेची पंढरपुरतून सुरुवात केली आहे.

ही यात्रा पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर,कवठेमंकाळ, सांगली ,मिरज, बारामती, इंदापूर ,भिगवण, पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा ,कर्जत ,चौंडी या मार्गावरून निघणार आहे. तर महाराष्ट्रातील २८८आमदारांना समक्ष भेटून आरक्षण संबंधी चे निवेदन देणार असून या यात्रेची सांगता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मगावी चौंडी येथे होणार होणार आहे असल्याचे संयोजक विष्णू सायगुंडे यांनी बोलताना सांगितले. यावेळी समाजाचे नेते अर्जुन सलगर, आदित्य फत्तेपुरकर, पंकज देवकते, संजय लवटे, राजेंद्रकुमार बुद्याळ, नितीन काळे, विनायक मेटकरीआदी मान्यवर उपस्थित होते.

युएईकडून पाकिस्तानींना व्हिसा बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या