19 C
Latur
Wednesday, November 30, 2022
Homeसोलापूरसोलापूरहून दिल्लीस जाण्यासाठी नवीन रेल्वेच्या मागणीला यश

सोलापूरहून दिल्लीस जाण्यासाठी नवीन रेल्वेच्या मागणीला यश

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूरहून दिल्लीस जाण्यासाठी कर्नाटक एक्स्प्रेस केवळ एकच रेल्वे आहे. त्यामुळे दिल्लीकडे जाण्यासाठी नवीन रेल्वेची अत्यंत आवश्यकता होती. म्हणून हुबळी – नवी दिल्ली ही रेल्वे सेवा सोलापूर मार्गे करावी जेणेकरून कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यातील प्रवाश्यांना याचा लाभ होईल यासाठी वारंवार खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामीजी यांनी मागणी केली होती. त्या मागणीस यश आले असून हुबळी – निजामुद्दीन – हुबळी ही नवी साप्ताहिक रेल्वे सोलापूरमार्गे दिल्लीस जाण्याची सुविधा होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून सोलापूरकरांना दिवाळी भेटच मिळाल्याची भावना खा. डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केली.

हुबळी येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हुबळी – निजामुद्दीन – हुबळी रेल्वे क्रमांक २०६५७/५८ या नवी रेल्वेस झेंडा दाखवून सुरुवात केली. सोलापूरमार्गे दिल्लीस तसेच सोलापूरहून हुबळीकडे जाण्यासाठी प्रति शुक्रवारी रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्नाटक एक्स्प्रेस शिवाय ही दुसरी रेल्वे गाडी दिलीस जाण्यासाठी सुविधा होणार आहे. सकाळी ८.३५ वाजता दिल्लीकडे जाण्यासाठी तर रात्री ७.०० वाजता हुबळीकडे जाण्यासाठी सोलापुरात थांबा असणार आहे. सध्या ही गाडी साप्ताहिक असून ही गाडी दररोज सुरू करण्याची मागणी करणार असल्याचेही खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामीजी यांनी सांगितले.

हुबळी-सोलापूरमार्गे नवी दिल्लीसाठी नवी रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या ३ वर्षांपासून खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामीजी यांनी केली होती. ८ ऑक्टो. २०२० रोजी मध्य रेल्वे विभागीय समिती बैठकीत, १६ ऑक्टो. २०२१ हुबळी विभागीय दक्षिण पश्चिम रेल्वे समिती बैठक, १७ मार्च २०२२ अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसेच रेल्वे अर्थसंकल्पीय बैठकीत तसेच ८ जुलै रोजी मध्य रेल्वे विभागीय समिती बैठकीत याबाबत मागणी केली होती. तसेच १५ मार्च २०२२ रोजी संसदेतही याबाबत मागणी केली होती.

या मागणीचा विचार करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोलापूरकरांना दिवाळी भेटच दिल्याबद्दल खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामीजी यांनी सर्वांचे समस्त सोलापूरकरांच्या वतीने आभार व्यक्त केले. उत्तर भारत व दक्षिण भारत ( हुबळी) कडे जाण्यासाठी दुसरी रेल्वेसेवा उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी मी करीत होतो, त्याचा केंद्रीय नेतृत्वाने मान्य करीत नवी रेल्वेसेवा सुरू केल्याचे खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामीजी यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या