22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसोलापूरमोहोळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर

मोहोळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर

एकमत ऑनलाईन

मोहोळ : एक वर्ष पूर्ण झाले ग्रामीण रुग्णालयाला एक रुग्णवाहीका मिळू शकत नाही या गोष्टीचे ना मोहोळ चे आमदार यशवंत माने यांना ना सतरा नगरसेवकांना या गंभीर गोष्टी कडे लक्ष द्यायला वेळ नाही.मोहोळ शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच असून तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वरचेवर वाढत आहे शुक्रवारी मोहोळ शहरातील ४ रुग्णांसह तालुक्यामधील ३२ कोरोना क्रियाशील रुग्ण अशी कोरोना रुग्ण संख्येत भर पडली आहे .
सध्या मोहोळ तालुक्यात ३९९ रुग्ण क्रियाशील असून या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान दि . १५ पासून ब्रेक द चैन करीता लावलेल्या निबंधावर मोहोळ शहरासह तालुक्यात प्रशासनाचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे . मोहोळ शहरातील दुकानदार मात्र आपाल्या दुकानाची अर्धी शर्टर उघडून गि-हाईक करताना सर्वत्र दिसून येत आहे साहजिकच नागरिकांची गर्दी होत असून यावर ना पोलीस प्रशासनाचे ना मोहोळ नगरपरिषदेच्या प्रशासनाचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे . मोहोळ शहरासह तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यात कमी आलेल्या कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे . दि . १६ पर्यंत मोहोळ शहरात २९ जणांचा तर ग्रामीणमध्ये ८३ जणांचा मृत्यू झाला आहे . तालुक्यात आतापर्यंत ९ हजार ८५ जणांचे लसीकरण झाले असून , त्यात शहरातील ५ हजार १२ तर ग्रामीणमधील ४ हजार ७६ जणांचा समावेश आहे.

मोहोळ तालुक्यामध्ये शासकीय विद्यार्थी वसतिगृह नजीक पिंपरी येथील कोविड केअर सेंटर मध्ये १५७ तर कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथे ५१ असे दोन्ही सेंटर मधील एकूण २०८ क्रियाशील रुग्णांसह एकूण ३९९ रुग्णांवर मोहोळ मधील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत . दरम्यान मोहोळ शहरासह तालुक्यातील पोखरापूर , पेनूर , खंडाळी , आष्टी , शेटफळ , सौंदणे , पाटकूल , पापरी , तेलंगवाडी , देवडी , अनगर या शहरांची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे या आकडेवारी वरून दिसून येत आहे . शहरातील ग्रामीण रुग्णालयात एखाद्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला कोव्हिड सेंटरपर्यंत सोडण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाकडे स्वत:ची रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णाला सेंटरला जावे लागत आहे . लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोहोळ ग्रामीण रुग्णालयासाठी हक्काची रुग्णवाहिका अद्याप मिळू शकली नाही.

निवघ्यात पुन्हा ब्रेक द चैन मुळे कोरोना रुग्न कमी व्हायला मदत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या