विश्वनाथ चव्हाण/ अक्कलकोट
अक्कलकोट बस स्थानकाची इमारत अत्यंत जुनी असुन ति ईमारत पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. इमारतीच्या कॉलम ची पडझड होत, सिंमेट व वाळू निघुन आतिल लोखंडीरॉड दिसत आहे.बस स्टॅन्डची दुरावस्था वाईट झाली असुन बस स्टँडची इमारत शेवटची घटका मोजत आहे.ति बसस्टँड नुसती नावालाच उरली आहे.ईमारत कोसळून मोठी जिवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशातुन उपस्थित होत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरामधून लाखो भाविक एसटी बसने दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे बसस्थानकावर सतत गर्दी असते.सध्याचे बसस्थानक जुने असून, त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या जिर्ण इमारतीमुळे स्वामी भक्तांची आणि स्थानिक नागरिकामध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झालेली आहे.
अक्कलकोट शहर हे तालुक्यातील जनतेसाठी एक शुलभ बाजारपेठ आहे. विविध खरेदी विकी करण्यासाठी नागरिकांनी एसटी बसने शहरात ये, जा करतात, तसेच ग्रामिण भागातील विदयार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरातील महाविदयालयात एसटी बसने ये,जा करतात, शहरातील विविध शासकीय कामानिमित्त पंचायत समिती,तहसील कार्यालय, खरेदी-विक्री कार्यालय,मार्केट कमिटी, व इतर कामासाठी नागरिकांनी एसटी बसला पसंदी देत ये.जा करतात, दिवसभरातील काम संपले की प्रत्येक जन एसटी स्टॅन्डकडे धाव घेत असतात. थांबून बसची वाट पाहवी लागते.इमारत फार जुनी असुनही ही इमारत धोकादायक बनली आहे.
पावसात तर याठिकाणी बस स्टॅन्ड मध्ये पाणीच पाणी साचलेली असते.एकूणच या बस स्टँडच्या गंभीर व धोकेदायक अशा दुरवस्थेमुळे बस स्टँडमध्ये उभे राहणा-या प्रवासी नागरिकांच्या जीवासही धोका होऊ शकतो. त्याचप्रमाणे बसची तासंतास वाट पाहणा-या महिला प्रवाशांना फार मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी सदर बसस्टँडच्या गैरसोयीकडे संबंधित लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी लक्ष देऊन सदर बसस्टँडची लवकरात-लवकर नविन इमारत व सुसज्ज असे बस स्टॅन्ड प्रवाशी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी प्रवासी व नागरिककाडून होत आहे.