22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसोलापूरशहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले २ कोटी अडीच लाख केले कमी

शहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले २ कोटी अडीच लाख केले कमी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कोरोना उपचारावर शासनाने ठरवून दिलेल्या बिलांच्या दरांपेक्षा अधिकचे दर लावून रूग्णांची लूट करणा-या दवाखान्यांना लेखापरीक्षकांनी चाप लावला आहे. सोलापूर शहरात वर्षभरात खासगी रूग्णालयांनी 7 हजार 860 कोरोना रूग्णांना लावलेले जादाचे दोन कोटी दोन लाख 49 हजार 933 रूपये लेखापरीक्षणांमुळे कमी झाले आहेत. यामध्ये शहरातील 47 दवाखान्यांचा समावेश असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

कोरोना काळात खाजगी रूग्णालये रूग्णांकडून जादा बील वसूल करीत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहर आणि ग्रामीण भागात खाजगी रूग्णांलयासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक नियुक्त केले होते. सोलापूर शहरात 26 लेखापरीक्षक नेमण्यात आले होते. प्रत्येक लेखापरीक्षकांकडे दोन-तीन रूग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याची जबाबदारी मनपा आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली होती.

शहरातील 47 रूग्णालयांनी 7860 रूग्णांचे 50 कोटी 72 लाख 14 हजार 376 रूपये बील आकारले होते. यातील शासन निर्देशातील दरानुसार लेखापरीक्षकांनी तपासणी करून दोन कोटी दोन लाख 49 हजार 933 रूपये जादा आकारले गेलेले पैसे कमी करण्यात आले आहेत. रूग्णांचे डिस्चार्ज होण्यापूर्वी रूग्णालयांनी केलेले बील लेखापरीक्षकाकडे जाते. लेखीपरीक्षक बिलाची तपासणी करून जादा बील आकारले असेल तर कमी करून देतात. शासनाच्या निर्देशानुसार बील असेल तर ते रूग्णांच्या नातेवाईकांना भरावे लागते.

प्रत्येक लेखापरीक्षकांना दोन-तीन दवाखान्याची जबाबादारी देण्यात आली आहे. मनपाच्या कोविड कंट्रोल रूमला तक्रार आलीकिंवा फोन आला तर रूग्णालयात जावून बिलाची तपासणी केली जाते. जून 2020 पासून बिलांची तपासणी करण्यात आली असून रूग्णांना बील कमी करून दिलासा दिला आहे. यामुळे बिलाबाबत रूग्णांच्या फसवणुकीचे प्रकार थांबले असल्याचे लेखाधिका-यांचे समन्वय अधिकारी विशाल पवार यांनी सांगितले.

सहा रुग्णालयांनी शासन दराप्रमाणे रक्कम आकारली
सोलापूर सिटी हॉस्पिटल- 20 रूग्णांचे 10लाख 12 हजार 460 रूपये, नोबल हॉस्पिटल- 46 रूग्णांचे 18लाख26हजार 900 रूपये, कृष्णा हॉस्पिटल- 17 रूग्णांचे पाच लाख 34 हजार रूपये, बालाजी हॉस्पिटल-24 रूग्णांचे 5 लाख 51 हजार 200 रूपये, श्री. बालाजी हॉस्पिटल, सैफुल-तीन रूग्णांचे 77 हजार 200 रूपये आणि युगंधर हॉस्पिटलमधील एका रूग्णांचे 34 हजार 90 रूपये या रूग्णालयांनी शासकीय दराप्रमाणे रूग्णांकडून रक्कम आकारली आहे.

शहरातील रुग्ण आणि रकमेची आकडेवारी
> बील कमी केलेल रूग्ण-7860
> एकूण बिलाची रक्कम-50 कोटी 72 लाख 14 हजार 376 रूपये
> कमी केलेले बील- दोन कोटी दोन लाख 49 हजार 933 रूपये

अवकाशातून इंटरनेटची नवी संकल्पना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या