सोलापूर : तुळजापुरात शिकारीला गेल्यानंतर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, सोलापुरात आलेल्या सासऱ्यावर तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी जावयासह सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा हल्ला रविवारी सायंकाळी ६.४५ वाजता झाला.
जावई श्रवण शिंदे, अविनाश शिंदे, भारत शिंदे, आनंद शिंदे, मोन्या शिंदे, वीरप्पा शिंदे (सर्व रा. तुळजापूर), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जखमी भद्री हणुमंत पवार (वय ३५ रा. यमगरवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) हे व त्यांचे जावई श्रवण शिंदे यांच्यासह सात ते आठ जण दि. ८ जून रोजी यमगरवाडीच्या माळरानात मारहाण केली.
शिकारीसाठी गेले होते. शिकार करीत असताना त्यांच्यात भांडण झाले होते.भांडण झाल्याने भद्री पवार हे सोलापुरातील पत्नीकडे राहण्यासाठी आले होते. भद्री पवार हे सोलापुरात आल्याचे समजल्यानंतर सहा जण त्यांच्या साईनगर अक्कलकोट रोड येथील घरी आले. भांडणाचा राग मनात धरून सर्व जणांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.मोन्या शींदे याने तुला खल्लास करतो,तुझा जीव घेतो असे म्हणत
हातातील तलवार भद्री पवार यांच्या पाठीत खुपसली, त्यामध्ये ते जखमी होऊन खाली पडले. वीरप्पा शिंदे ने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी भद्री पवार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक कुकडे करीत आहेत